पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

नुकताच एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. पंढरपूरमध्ये मोठा अपघात झाला. गाडी थेट कालव्यात पडल्याने खळबळ उडाली. हेच नाही तर या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. कालव्यातून गाडी बाहेर काढण्यात आली.

पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले... खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..
Pandharpur accident
| Updated on: Apr 04, 2026 | 11:52 AM

नुकताच एक धक्कादायक घटना पुढे आली. या घटनेने खळबळ उडाली. इरटीका गाडी कालव्यात पडल्याने मोठा अपघात झाला. नाशकात एक कार विहिरीत पडल्याने मोठा अपघात झाला, त्या अपघातात 9 जण ठार झाले, ही घटना ताजी असतानाच इरटीका कार कालव्यात पडल्याने 3 जणांचा मृत्यू झाला. ही घटना पंढरपूरच्या नातेपुते निरा उजव्या कालव्यादरम्यान घडली. मिळालेली अधिक माहिती अशी की, पंढरपूरच्या नातेपुते जवळ निरा उजवा कालव्याच्या पुलावरून एक ईरटीका गाडी अचानक कालव्यात पडली. ही कार मुंबईवरून फोंडशिरसकडे जात असताना थेट कालव्यात पडली आणि मोठा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, 3 जणांना वाचवण्यात यश मिळाले नाही.

कालव्यात गाडी पडल्याने मोठी खळबळ

ज्यावेळी कालव्यात कार पडली, त्यावेळी गाडीत चार जण असल्याची माहिती आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, गाडीत असलेल्या तीन जणांचा मृत्यू झाला. गाडी कालव्यात पडल्यानंतर तिघेही गाडीतच अडकले होते. पाटबंधारे खात्याचे शाखाअधिकारी घटनास्थळी पहाटेपासून हजर आहेत. यासोबतच अनेक अधिकारीही घटनास्थळी आहेत.

गाडीतील 3 जणांचा मृत्यू

ग्रामस्थही घटनास्थळी आहेत. फोकलेनद्वारे गाडी कुठे अडकली हे शोधले जात आहे. गाडीतील प्रवाशी मुळचे सातारा जिल्ह्यातील दुधबावी येथील असल्याची माहिती मिळत आहे. ते मुंबई येथे नोकरीनिमित्त स्थायिक झाले होते. फोंडशिरस येथे येत असताना आज पहाटे हा अपघात झाला. अपघातानंतर मोठा आवाज आल्याचेही सांगितले जाते.

पाटबंधारे खात्याचे शाखाअधिकारी घटनास्थळी

ही घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली. गाडी चालक सुनील टिळेकर हा अपघातामध्ये बचावला असल्याची माहिती मिळत आहे. या गाडीमध्ये सुनील टिळेकर याची पत्नी, सासू आणि सासरे होते, ते तिघेही मयत झाले. गाडी कालव्यातून काढण्यात आली आहे. मात्र, या अपघातानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अपघात नक्की कसा झाला, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाहीये. पोलिसांकडून या अपघात प्रकरणात अधिकचा तपास केला जात आहे.

Follow Us