AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समृद्धी महामार्गावर भयानक अपघात, एकाच कुटुंबातील तिघांसह मृतांची संख्या 8 वर, सरकारकडून मोठी मदत

Jalna Accident : समृद्धी महामार्गावर जालन्यातील कडवंची शिवारात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 महिलांचा मृत्यू झाला आहे. आता राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गावर भयानक अपघात, एकाच कुटुंबातील तिघांसह मृतांची संख्या 8 वर, सरकारकडून मोठी मदत
CM on Jalna AccidentImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 01, 2026 | 10:35 PM
Share

जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर कडवंची शिवारात आज सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 8 मजूरांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. नागपूरवरून मुंबईच्या दिशेने एक ट्रक निघाला होता. हा ट्रक भरधाव वेगात समृद्धी महामार्गावरून जात होता. याच भागात मजूर महिला काम करत होत्या. कामात गुंतलेल्या असतानाच भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने या मजूर महिलांना थेट उडवलं आहे. या अपघातानंतर मृतांचे मृतदेह जालन्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजप आमदार नारायण कुचे, शिवसेना आमदार अर्जुन खोतकर या दोघांनीही तात्काळ रुग्णालयात धाव घेत मृतांच्या नातेवाईकांसोबत संवाद साधला. यानंतर आता राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांसाठी आर्थिक मदत जाहीर करण्याच आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मदतीचा घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबाबत माहिती देताना ट्विट करत म्हटले की, जालनानजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या एका अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

या घटनेत जे लोक जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक स्वतः तेथे आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून जखमींसाठी प्रार्थना

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या अपघाताबाबत म्हटले की, जालना परिसरात समृद्धी महामार्गावर घडलेली भीषण अपघाताची घटना मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत आपले प्राण गमावलेल्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते.

अपघातातील मृतांची नावे

  • अलकाबाई दादाराव आदमाने (45) – निधोना
  • लक्ष्मीबाई संतोष मदन (35) – केळीगव्हाण.
  • मीना परमेश्वर आदमाने (45) – निधोना
  • कांचनबाई प्रकाश आदमाने (50) – निधोना
  • ताराबाई गहेणाजी चौधरी (60) – केळीगव्हाण
  • कडूबाई रामदास मदन (55) – केळीगव्हाण
  • सुमनबाई कचरू आदमाने (70) – निधोना
  • मंगलबाई शिनगारे
Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार