नागपूरमध्ये भाजपाला जबर धक्का, ऐनवेळी मोठा उलटफेर, अभिजीत वंजारींचा विजय, कोहळे पराभूत!

नागपूर पदवीधर निवडणुकीत मोठा उलटफेर होत काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी झाले आहे.त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करुन वातावरण दणाणून सोडले आहे.

नागपूरमध्ये भाजपाला जबर धक्का, ऐनवेळी मोठा उलटफेर, अभिजीत वंजारींचा विजय, कोहळे पराभूत!
nagpur mlc - Abhijeet Vanjari wins
| Updated on: Oct 28, 2026 | 11:44 PM

नागपूर पदवीधर निवडणुकीत मोठा उलटफेर होत काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करुन वातावरण दणाणून सोडले आहे. त्यांनी भाजपच्या सुधाकर कोहळे यांचा पराभव केला आहे. महाविकास आघाडीला आता पाच निवडणूकांपैकी महायुतीला दोन तर महाविकास आघाडीला तीन ठिकाणी विजय मिळाला आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. एकूण पाच जागांसाठी १८२ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे आहे.  पुणे, छत्रपती संभाजीनगर , नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघ, तसेच अमरावती आणि पुणे विभागातील शिक्षक मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे.

Loading...

नागपूर पदवीधर मतदार संघात एकूण ३८ उमेदवार रिंगणात उभे होते.  मुख्य लढत भाजपच्या सुधाकर कोहळे आणि काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांच्यात होती. सुमारे सहा दशकांच्या वर्चस्वानंतर २०२० मध्ये काँग्रेसने हिसकावलेली जागा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न भाजप करीत होता. या निवडणुकीत गेल्या निवडणुकीचे विजेते काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी मतात पुन्हा आघाडी घेतली आणि त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लाेष सुरु केला. भाजपाच्या सुधाकर कोहळे यांनी आपला पराभव मान्य केला आहे.

हा विजय म्हणजे शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ

जो जिता वो सिंकदर, हा विजय म्हणजे शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. अजूनही लीड सुरु आहे. हे डायरेक्ट मतदान नव्हते पसंतीचे मतदान असल्याने याचा फायदा झाला, आमची मते आम्हाला मिळाली आहेत . सर्वांचे आम्हाला सहकार्य मिळाले असे विजयी उमेदवार अभिजीत वंजारी यांनी म्हटले आहे. आम्ही आमदार म्हणून विधान परिषदेत जे मुद्दे काढले त्याला मिळालेला हा पाठिंबा आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो. हा विजय सगळे नेते, कार्यकर्ते, अधिकारी सगळ्यांचा विजय आहे. मविआ म्हणून लढलो, आमचा विजय झाला. त्यांनी केवळ शो उभा केला होता. त्यांनी प्रचार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बूथवर सर्व नेते होते. मात्र, पदवीधर मतदार नव्हते. आमची मते आम्हाला मिळाली. मी पहिल्या पासून सांगत होतो की आमचा विजय होणार आहे. बॅलटवर निवडणुका होत्या, म्हणून संघाच्या भूमीवर मी निवडून आलो असेही अभिजीत वंजारी यांनी म्हटले आहे.अजूनही लीड सुरु आहे.  ५ ते ७ हजारांच्या मतांनी निवडून येणार असा विश्वास असल्याचेही अभिजीत वंजारी यांनी सांगितले.

या मतदारसंघाचा राजकीय इतिहास

१९६० ते २०२०: नागपूर पदवीधर मतदारसंघावर भाजप आणि जनसंघाचे दीर्घकाळ वर्चस्व होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक प्रमुख भाजप नेत्यांनी या जागेचे प्रतिनिधित्व केले आहे.

१९७८: गंगाधरराव फडणवीस या जागेवरून जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले होते.

१९९०: नितीन गडकरी या जागेवरून विधान परिषदेत पोहोचले आणि त्यांनी अनेक वर्षे या जागेचे प्रतिनिधित्व केले.

२०१४: भाजपचे अनिल सोळे या जागेवरून निवडून आले.

२०२०: काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी तत्कालीन भाजप उमेदवार संदीप जोशी यांचा पराभव करून इतिहास रचला. काँग्रेसने जवळपास ५८ वर्षांनंतर तत्कालिन जनसंघ आणि भाजपाकडून ही जागा हिसकावून घेतली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us