Makar Sankrant|जावयासाठी मानाचे पान; नाशिकच्या सराफ्यात चांदीचा पतंग, काय आहे किंमत?

| Updated on: Jan 12, 2022 | 1:40 PM

नाशिकच्या सराफा बाजारात बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 48200 रुपये नोंदवले गेले. 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 46900 रुपये नोंदवले गेले.

Makar Sankrant|जावयासाठी मानाचे पान; नाशिकच्या सराफ्यात चांदीचा पतंग, काय आहे किंमत?
Silver kites for sale in Nashik's Sarafa Market
Follow us on

नाशिकः भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाचे एक वेगळे महत्त्व आहे. इतकेच काय त्या सणादिवशी घरात काय अन्नपदार्थ करावेत, हे सुद्धा सांगितले आहे. होळी म्हणले की पुरणाची पोळी येतेच. तसेच संक्रांत (Makar Sankrant) म्हटले की, तीळगूळ आणि सोबतीला तिळाची पोळीही. काही सणांना जावयाचा वेगळाच मान असतो. आता या पद्धती सुद्धा प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या असतात. नाशिकमध्ये शुक्रवारी साजऱ्या होणाऱ्या मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सराफा बाजारात चक्क चांदीचे पंतग आणि चांदीच्या चक्री विकायला आल्या आहेत. हे साहित्य जावयाला मान म्हणून दिले जाते. विशेष म्हणजे या खरेदीसाठी नाशिककर गर्दी करताना दिसतायत.

अशी आहे किंमत?

नाशिक येथील सराफा बाजारात जावयाला चांदीचा पंतग आणि चक्री देण्यासाठी शहरवासीयांकडून जोरदार खरेदी सुरू आहे. अवघ्या 1100 शे रुपयांपासून ते थेट 4000 रुपयांपर्यंत या पतंगाची किंमत आहे. याबद्दल माहिती देताना दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे म्हणाले की, सध्या सराफा बाजारात चांदीचे पतंग आणि चांदीच्या चक्रीसाठी मोठी मागणीय. प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे खरेदी करतात. अगदी अकराशे रुपयांपासून या वस्तू उपलब्ध आहेत. अजून दोन दिवस म्हणजेच मकर संक्रांतीपर्यंत या वस्तूंना अशीच मागणी असणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सोन्याचा दागिना देतात…

आपल्याकडे दर तीन वर्षांनी अधिक महिना येतो. मराठी महिने हे 30 दिवसांचे असतात. वर्षांचे दिवस 365. मग हे दिवस भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनी अधिक मास येतो. त्याला कोणी मलमास किंवा धोंडा महिना म्हणतात. असे वाईट बोलणे योग्य नाही म्हणून श्री विष्णूने त्याला स्वतःचे पुरुषोत्तम मास असे नाव दिल्याचे म्हटले जाते. या अधिक महिन्यातही जावयाला सासुरवाडीला मानाने बोलावले जाते. त्याला गोडाचे जेवण (अनारसे) दिले जाते. पुरणाचे अथवा इतर गोड असे धोंडे खाण्यासाठी केले जातात. जावयाला अनेकजण सोन्याचा दागिनाही भेट देतात.

आजची सोन्याची किंमत

नाशिकच्या सराफा बाजारात बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 48200 रुपये नोंदवले गेले. 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 46900 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 62300 रुपये नोंदवले गेले आहेत. या दरावर तीन टक्के जीएसटी अतिरिक्त असेल, अशी माहिती दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी दिली. काल बुधवारी नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 48000 रुपये नोंदवले गेले होते. कालच्या तुलनेत सोने आज स्वस्त झालेले दिसले. 22 कॅरेट सोन्याच्या दरात मात्र कालच्या तुलनेत 850 रुपयांची वाढ झाली, तर चांदी किलोमागे 1200 रुपयांनी स्वस्त झालेली दिसली.

आपल्याकडे मकरसंक्रांतीला जावयाला चांदीचे पतंग देण्याची पद्धत आहे. नाशिकच्या सराफा बाजारात असे पतंग खरेदी करायला ग्राहक गर्दी करत आहेत. अगदी अकराशे रुपयांपासून ते चार हजार रुपयांपर्यंत या पतंगाची किंमत आहे.

– गिरीश नवसे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन

इतर बातम्याः

Devyani Farande| 2 टर्म आमदारकी, महापालिकेतही छाप; परखड नेतृत्व देवयानी फरांदेंच्या वाटचालीवर वाढदिवसानिमित्त नजर …

Nashik Corona|नाशिकमध्ये आदिवासी महिलांचे लसीकरण कौतुकास्पद, राज्यभर अंमलबजावणी व्हावी, उपसभापतींची थाप…!

Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली