नाशिकः ऐन निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेतील सत्ताधारी भाजपला आरसा दाखवण्याची हिंमत करू शकतात, त्या म्हणजे आमदार देवयानी फरांदे. (Devyani Farande) विशेष म्हणजे त्याही स्वतः भाजपच्या. (Bjp) नाशिकधील डेंग्यूवरून महापालिकेला लक्ष्य करणाऱ्या आमदार फरांदे यांनी रस्त्यांच्या निकृष्ट कामावरूनही तोफ डागली. या कामाची जोपर्यंत आयुक्त स्वतः पाहणी करून अहवाल देत नाहीत, तोपर्यंत कंत्राटदाराची बिले देण्यात येऊ नये, अशी सूचनाही केली. अन् त्यापूर्वी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारविरोधात वाढीव वीजबिलावरून जोरदार आंदोलनही केले. ही दोन उदाहरणे यासाठीच की, पक्ष स्वतःचा असो की, दुसरा. आमदार देवयानी फरांदे या कायम अभ्यासू व परखड नेतृत्व गुणांमुळेच चर्चेत राहतात. त्यांचा आज 12 जानेवारी रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या आजवरच्या कामावर एक नजर…