AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्या बालन दिवसाला किती सिगारेट पिते? ‘स्मोक करायला आवडतं कारण…’ अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Vidya Balan on smoking | विद्या बालन हिला सिगारेट प्यायला प्रचंड आवडतं, दिवसाला किती सिगारेट पिते अभिनेत्री? स्वतःच केला मोठा खुलासा... नुकताच झालेल्या मुलाखतीत विद्या हिने सिगारेटबद्दल सोडलं मौन... कॉलेजमध्ये असताना देखील अभिनेत्रीला आवडायचा सिगारेटचा वास...

विद्या बालन दिवसाला किती सिगारेट पिते? 'स्मोक करायला आवडतं कारण...' अभिनेत्रीचा मोठा खुलासा
| Updated on: Apr 26, 2024 | 9:46 AM
Share

अभिनेत्री विद्या बालन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ‘दो और दो प्यार’ सिनेमामुळे चर्चेत आहे. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री सिगारेटबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, विद्या हिने ‘द डर्टी पिक्चर’ सिनेमात दिवंगत अभिनेत्री सिल्क स्मिता यांची भूमिका साकारली होती. भूमिका साकारण्यासाठी विद्या हिने सिनेमात सिगारेट प्यायली होती. पण सिनेमाची शुटींग संपल्यानंतर अभिनेत्री सिगारेट पिण्याची सवय लागली. अभिनेत्रीला सिगारेटचा वास आवडू लागला होता. याबद्दल अभिनेत्री काय म्हणाली जाणून घ्या…

सिगारेटच्या सवयीबद्दल विद्या बालन म्हणाली, ‘मी ‘द डर्टी पिक्चर’ सिनेमाच्या आधी सिगारेट प्यायली होती. सिगारेट कशी प्यायची असते मला माहिती आहे. पण कहीच सिगारेटला हात लावू शकली नाही… तुम्हाला देखील आता म्हणत असाल ही असं का बोलत आहे…’

‘काही भूमिका अशा असतात ज्यामध्ये तुम्ही नकली अभिनय करु शकत नाही. म्हणून मी भूमिकेसाठी सिगारेट प्यायली. सुरुवातीला माझ्या मनात असहजता होती कारण सिगारेट पिणाऱ्या मुलींबद्दल लोकांनी त्यांच्या मनात एक धारणा तयार केली होती. पण आता कोणी पूर्वीसारखं जज करत नाही…’

पुढे विद्या म्हणाली, ‘द डर्टी पिक्चर’ सिनेमामुळे मला सिगारेट पिण्याची सवय लागली होती. मी दिवसाला 2 ते 3 सिगारेट प्यायचे..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त विद्या आणि तिच्या सिगारेट पिण्याच्या सवयीची चर्चा रंगली आहे.

विद्या आता देखील सिगारेट पिते का? या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, ‘मला नाही वाटत की ही गोष्ट मी कॅमेऱ्यासमोर बोलायला हवी. पण मला सिगारेट प्यायल्याने आनंद मिळतो. जर तुम्ही मला म्हणाले असते सिगारेट प्यायल्याने कोणतं नुकसान होत नाही तर, मी आज सिगारेट पिणारी झाली असती…’

‘मला सिगारेटचा वास प्रचंड आवडतो. कॉलेजमध्ये असताना देखील मला सिगारेटचा वास प्रचंड आवडायचा. मी बस स्टॉपवर जी व्यक्ती सिगारेट पित आहे त्यांच्या बाजूला बसून सिगारेटचा वास घ्यायची..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

विद्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर विद्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी विद्या देखील कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...