काँग्रेस- राष्ट्रवादीचे अनेकजण संपर्कात : राधाकृष्ण विखे पाटील

विखे पाटील म्हणाले, “काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवर अनेक जण नाराज आहेत. म्हणूनच मी स्वतः भाजपमध्ये आलो. येत्या काळात भाजप प्रवेशासाठी अनेकजण उत्सुक आहेत. काही जण संपर्कात आहेत. मात्र पक्ष अंतिम निर्णय घेईल. आणखी कुणी प्रवेश केला तर नवल नाही. मेळ घालावा लागेल. ”.

काँग्रेस- राष्ट्रवादीचे अनेकजण संपर्कात : राधाकृष्ण विखे पाटील
Follow us
| Updated on: Jul 12, 2019 | 3:04 PM

सोलापूर :  “आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस- राष्ट्रवादीचे अनेकजण संपर्कात आहेत. काहीजण भाजप प्रवेशासाठी इच्छुक आहेत”, असा दावा काँग्रेसचा राजीनामा देऊन थेट भाजपकडून मंत्रिमंडळात दाखल झालेले गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. ते सोलापुरात बोलत होते.

विखे पाटील म्हणाले, “काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवर अनेक जण नाराज आहेत. म्हणूनच मी स्वतः भाजपमध्ये आलो. येत्या काळात भाजप प्रवेशासाठी अनेकजण उत्सुक आहेत. काही जण संपर्कात आहेत. मात्र पक्ष अंतिम निर्णय घेईल. आणखी कुणी प्रवेश केला तर नवल नाही. मेळ घालावा लागेल. ”.

सकारात्मक भूमिका घेऊन, विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात वेगवेगळ्या आघाड्यांवर सरकारने विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये येण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्याचा फायदा भाजपला होईल, असं विखे पाटील यांनी नमूद केलं.

काँग्रेसमुक्त महाराष्ट्र माझ्यासाठी मुद्दा नाही. प्रत्येक पक्षाला भूमिका असते, धोरणं असतात. राजकीय पक्षाबाबत मी काही भाष्य करणार नाही. सध्याचं सरकार अनेक रखडलेली कामं करत आहे. आरक्षणाचा मुद्दा असो वा अन्य मुद्दे मुख्यमंत्र्यांनी निकाली लावला. सरकार सकारात्मक भूमिका घेतं, त्यामुळे सर्वांना सरकारबद्दल आकर्षण आहे, असं विखे म्हणाले.

दरम्यान, विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच थेट काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरच टीकास्त्र सोडलं होतं. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात काँग्रेसच्या जागांची संख्या 82 वरुन निम्मी म्हणजे 42 झाली. त्यामुळे त्यांनी माझी काळजी करु नये. आधी पक्षाचा विचार करावा, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती.

विखेंविरुद्ध हायकोर्टात याचिका

विरोधी पक्षनेतेपदावरुन थेट राज्याच्या मंत्रिमंडळात दाखल झालेले गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. बेकायदेशीर मंत्रिपद दिल्याचा दावा करत, अॅडव्होकेट सतिश तळेकर यांनी ही याचिका दाखल केली. पक्षांतर बंदी असताना कुठल्याही नेत्याला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात मंत्री म्हणून जाता येणार नाही, असा तळेकर यांचा युक्तीवाद आहे. त्यामुळेच विखे पाटलांना दिलेलं मंत्रिपद बेकायदा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या 

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रिपदाविरोधात हायकोर्टात याचिका  

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.