AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड

Maval King Omya : मावळच्या बैलगाडा शर्यतीच्या मैदानात आपल्या वेगाने दबदबा निर्माण करणारा भारतकेसरी ओम्या (बैल) याचे निधन झाले. शेकडो बैलगाडाप्रेमींच्या उपस्थितीत ओम्याला अखेरचा निरोप देण्यात आला.

2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
Omya Bail Death NewsImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 29, 2026 | 11:52 PM
Share

रणजीत जाधव, मावळ,पुणे : मावळच्या बैलगाडा शर्यतीच्या मैदानात आपल्या वेगाने दबदबा निर्माण करणारा भारतकेसरी ओम्या (बैल) याचे निधन झाले. वारंगवाडी येथील रामनाथ वारिंगे यांच्या कुटुंबाचा लाडका ओम्या अनेक प्रसिद्ध घाटांमध्ये विजयी ठरला होता. ओम्याच्या निधनाची बातमी समजताच मावळातील बैलगाडा शौकिनांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. शेकडो बैलगाडाप्रेमींच्या उपस्थितीत ओम्याला अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी गाडामालक रामनाथ वारिंगे यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

ओम्या मावळच्या मातीतला अभिमान…

अनेक मान्यवरांनी या ओम्याला श्रद्धांजली अर्पण करत तो मावळच्या मातीतला अभिमान असल्याचे म्हटले. बैलगाडा शर्यतीच्या मैदानातील ओम्याचा वेग, जिद्द आणि ठसा कायम स्मरणात राहणार आहे. मावळचे ‘भारतकेसरी ओम्या’ हे रामनाथ वारिंगे, वारंगवाडी यांचे प्रसिद्ध बैल होते. गेली सुमारे 9 वर्षे ओम्याने महाराष्ट्रातील विविध बैलगाडा घाटांवर आपल्या वेगाचा दबदबा निर्माण केला होता. आता बैलगाडा शर्यत प्रेमींना लाडक्या ओम्याची वेगवान शर्यत पाहता येणार नाही.

ओम्याच्या नावावर असलेली मोठी बक्षिसे

  • 2 जेसीबी
  • 8 थार
  • 12 ट्रॅक्टर
  • 3 बोलेरो
  • 175 दुचाकी
  • 25 चांदीच्या गदा
  • 1500 पेक्षा अधिक सन्मानचिन्हे

वरील बक्षिसांसह ओम्याने बुलेट, सोन्याची बक्षिसे आणि रोख रक्कम अशी अनेक बक्षिसे जिंकली आहेत. ओम्याला ‘मावळ किंग’, ‘भारतकेसरी’, ‘महाराष्ट्र केसरी’, ‘मावळची राजधानी एक्सप्रेस’, ‘तुफान गतीचा बेताज बादशहा’ आणि ‘बैलगाडा क्षेत्राचा कोहिनूर’ अशा बिरुदांनी गौरवण्यात आले होते. 2024 मध्ये मावळ फेस्टिव्हलमध्ये ‘बैलगाडा शर्यतीचा राजा – मावळ किंग ओम्या’ म्हणून त्याचा विशेष सत्कारही करण्यात आला होता.

मावळच्या बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रात मोठी पोकळी

मावळच्या बैलगाडा शर्यतीच्या मैदानावर ओम्याने निर्माण केलेला वेगाचा दबदबा, त्याची जिद्द आणि त्याने मिळवलेले यश यामुळे तो बैलगाडाप्रेमींच्या कायम स्मरणात राहणार आहे. ओम्याच्या निधनाने मावळच्या बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, चाहत्यांनी सोशल मीडियासह प्रत्यक्ष उपस्थित राहून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप