AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणातून सर्वात मोठी बातमी! बड्या नेत्याचा अर्ज बाद, कुणाला होणार फायदा?

राज्यात सध्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आता अमरावतीतून मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार माजी आमदार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.

राजकारणातून सर्वात मोठी बातमी! बड्या नेत्याचा अर्ज बाद, कुणाला होणार फायदा?
Viplove Bajoria Application CancelImage Credit source: Google
| Updated on: Jun 02, 2026 | 9:01 PM
Share

राज्यात सध्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आता अमरावतीतून मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार माजी आमदार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी आक्षेप घेतल्यानंतर बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विप्लव बाजोरिया यांचा अर्ज बाद

विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था कोट्यातील निवडणुकीतून मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार माजी आमदार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. यानंतर बोलताना बायोरिया यांनी आमचा नामांकन अर्ज बाद व्हावा यासाठी चार उमेदवार एकत्र येऊन कटककारस्थान रचले असल्याचा आरोप करत या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहे अशी माहिती दिली आहे.

अमरावतीत चार उमेदवारी अर्ज कायम

अमरावतीच्या जागेसाठी आता चौरंगी लढत पहायला मिळणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख, महायुतीचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा आणि प्रशांत महल्ले या चार उमेदवारांचे उमेदवारी अर्ज कायम आहेत. या चौघांमध्ये आता लढत पहायला मिळणार आहे.

सोलापूरात काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद

सोलापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्जच बाद झाला आहे. येथे काँग्रेसने आदित्य फत्तेपूरकर यांना उमेदवारी दिली होती. परंतु त्यांचा उमेदवारी अर्ज आता बाद झाला आहे. काँग्रेसचे सूचक नागेश भोसले यांची सही बोगस असल्याचे अर्ज पडताळणीत स्पष्ट झाले. त्यामुळेच फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेलसा मोठा धक्का बसला आहे. फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली आहे.

Follow Us
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा