MLC Election : पाच मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडावल्या; आता 182 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला, मतदानासाठी यंत्रणाही सज्ज
MLC Election : महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. आता 182 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदानासाठी यंत्रणाही सज्ज झाली आहे.

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या तीन पदवीधर , दोन शिक्षक मतदारसंघात निवडणुकीसाठी उद्या शुक्रवारी मतदान होणार आहे. मतदान हे सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत होईल. पाच जागांवर एकूण 182 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यातील पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर , अमरावती आणि पुण्यात निवडणूक आहे. या निवडणुकीत 10 लाख 68 हजार 72 मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदानासाठी यंत्रणा देखील सज्ज झाल्या आहेत.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात 41 उमेदवार आहेत. तर पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार आहेत. तर नागपूर पदवीधर मतदारसंघात 38 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघात 26 , पुणे विभागात 30 उमेदवार रिंगणार आहेत. पुणे विभागातील पदवीधरमतदारसंघात सर्वाधिक 47 उमेदवार रिंगणात आहेत. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून ४१, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून ४७, तर नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून ३८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून २६ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून ३० उमेदवार रिंगणात आहेत. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक ४७ उमेदवार आहेत.
नागपुरात मतदार यंत्रणा सज्ज
नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी मतदान साहित्य वितरणासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. चोख पोलीस बंदोबस्तात पोलिंग पार्टीला मतदान साहित्य वितरण होणार आहे. नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी एकूण 455 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 246 केंद्र नागपूर जिल्ह्यात आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान पथक सज्ज होईल. यासाठी 2 हजार 535 अधिकारी,कर्मचाऱ्याची करण्यात आली नियुक्ती. याशिवाय केंद्र शासनाचे 476 अधिकारी आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी केंद्रीय सार्वजनिक उपक्रमाचे 32 अधिकारी उपलब्ध करून देण्यात आले.
नागपुरात मतदान अन् मतमोजणी कधी?
या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात एकूण २ लाख ५५ हजार मतदारांची नोंदणी आहे. यामध्ये १ लाख ४७ हजार २८० पुरुष मतदार आणि १ लाख ८ हजार ३०१ महिला मतदाराचा समावेश आहे.
जिल्हानिहाय मतदानाची आकडेवारी:
– नागपूर जिल्हा – 144,466
– चंद्रपूर जिल्हा – 32,262
– गोंदिया जिल्हा – 22,176
– वर्धा जिल्हा – 21,742
– भंडारा जिल्हा – 21,349
– गडचिरोली जिल्हा – 13,106
नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक, तर गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी मतदार
जिल्हानिहाय मतदान केंद्रे:
– नागपूर – 246
– चंद्रपूर – 58
– वर्धा – 41
– गोंदिया – 39
– भंडारा – 35
– गडचिरोली – 26