Graduate Constituency election : पदवीधरांचा आमदार कोण होणार, ३ जागांवर कुणामध्ये लढत? कुणाचं भविष्य पालटणार?

पदवीधर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. तिन्ही मतदारसंघात महायुती आणि विरोधकांच्या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

Graduate Constituency election : पदवीधरांचा आमदार कोण होणार, ३ जागांवर कुणामध्ये लढत? कुणाचं भविष्य पालटणार?
graduate election
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 22, 2026 | 11:32 AM

राज्यातील तीन पदवीधर मतदारसंघात निवडणुकीची धामधूम पाहायला मिळणार आहे. तिन्ही मतदारसंघात काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या. तिन्ही पदवीधर मतदारसंघात सत्ताधारी आणि विरोधकांच्या उमेदवारांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात उद्या शुक्रवारी मतदान होणार आहे. त्यामुळे तिन्ही मतदारसंघात कोण उमेदवार आहेत, कोणामध्ये लढत होणार? हे जाणून घ्या.

तिन्ही मतदारसंघात कोण गुलाल उधळणार?

Loading...

पुणे पदवीधर मतदारसंघात एकूण 388000 मतदार आहेत. या मतदारसंघात भाजपकडून स्मिता जाधव, शरद पवार गटाकडून हर्षदा देशमुख तर ठाकरे गटाकडून सुनिल मोदी रिंगणात आहेत. तर नागपूर पदवीधर मतदारसंघात एकूण 258637 मतदार आहे. नागपुरात भाजपकडून सुधाकर कोहळे, काँग्रेसकडून  अभिजीत वंजारी, तर राष्ट्रवादीचे नितेश कराळे हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात एकूण 326701 मतदार आहे. संभाजीनगरमध्ये सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीकडून सतिश चव्हाण, ठाकरे गटाकडून दिलिप घुगे मैदानात आहेत. तर शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) प्रतापसिंह पाटील हे रिंगणात आहेत. तिन्ही मतदारसंघात या प्रमुख नेत्यांमध्ये चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं या निवडणुकीकडे लागलं आहे.

मतांचं गणित काय? 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सतिश चव्हाण हे 57895 मतांनी विजयी झाले होते. चव्हाण हे मागील निवडणुकीत 116638 मते मिळाली होती. त्यांनी भाजपचे शिरिश बोराळकर यांना धूळ चारली होती. पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार अरूण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली होती. लाड यांनी 48 हजार 824 मतांनी बाजी मारली होती. त्यांनी भाजपच्या संग्राम देशमुख यांचा पराभव केला होता. नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांना धूळ चारली होती. वंजारी यांना 61701 मंत मिळाली तर जोशी यांना 42791 मते मिळाली होती. तब्बल 18910 मतांनी वंजारी विजयी झाले होते. नागपूर पदवीधर मतदारसंघात 1978 सालानंतरचा पहिल्यांदा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला.  मागील काही वर्षात झालेल्या पक्ष फोडाफोडीमुळे मतांचं गणित बदलण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us