AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत मोठी घडामोड, राज ठाकरे आणि सोनिया गांधींची भेट

ईव्हीएम प्रश्नावर निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी राज ठाकरे सध्या दिल्लीत आहेत. 14 वर्षात पहिल्यांदाच राज ठाकरेंचा दिल्ली दौरा आहे. यानिमित्ताने त्यांनी राजकीय नेत्यांचीही भेट घेतल्याचं दिसून येतंय.

दिल्लीत मोठी घडामोड, राज ठाकरे आणि सोनिया गांधींची भेट
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 08, 2019 | 5:36 PM
Share

नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीबाबत कोणतीही माहिती अगोदर देण्यात आली नव्हती. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ईव्हीएम प्रश्नावर निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी राज ठाकरे सध्या दिल्लीत आहेत. 14 वर्षात पहिल्यांदाच राज ठाकरेंचा दिल्ली दौरा आहे. यानिमित्ताने त्यांनी राजकीय नेत्यांचीही भेट घेतल्याचं दिसून येतंय.

काँग्रेस सध्या पक्षासाठी नवा अध्यक्ष शोधत आहे. यूपीएच्या अध्यक्षा असलेल्या सोनिया गांधींसोबतच भेट घेतल्यामुळे याकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाहिलं जातंय. कारण, लोकसभेला राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसच्या राज्यातील काही नेत्यांचा विरोध होता. पण नंतर काँग्रेसच्या नेत्यांनीच मनसेला सोबत घ्यायला हवं, असं मत व्यक्त केलं होतं. विधानसभेसाठी राज्यात नवं समीकरण जुळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ही सदिच्छा भेट होती की यामध्ये काही राजकीय चर्चा झाली याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

ईव्हीएम प्रश्नावर निवडणूक आयुक्तांची भेट

राज ठाकरे यांनी निवडणूक आयुक्तांचीही भेट घेतली. यानंतर ते म्हणाले, “2014 नंतर ज्या निवडणुका झाल्या, त्यात जे काय झालं, त्याबाबत शंका आहे. त्यामुळे यापुढील निवडणुका आता बॅलेट पेपरवर घ्याव्या, अशी मागणी आम्ही निवडणूक आयुक्तांकडे केली. ईव्हीएमबाबत देशभरात संशय आहे. मी केलेलं मतदान माझ्या उमेदवाराला पोहोचलंय की नाही याबद्दल शंका असेल, तर मग मशीन हव्यातच कशाला?  ही गोष्ट मी त्यांच्यासमोर ठेवली. महाराष्ट्रातील आगामी निवडणुका शिक्क्याने व्हाव्या अशी मागणी केली. मला वाटत नाही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेल. पण उद्या असं नको व्हायला की आम्ही त्यांना कळवलंच नाही. एक फॉरमॅलिटी म्हणून भेट घेऊन पत्र दिलं. बाकी पुढे काय करायचं हे आम्ही बघू”

विरोधकांना ईव्हीएम प्रश्नावर एकत्र आणण्याचे प्रयत्न

राज्यात पुढील तीन महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. ईव्हीएमवर या निवडणूक झाल्यास राज ठाकरे, निषेध म्हणून निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याच्या मनःस्थितीत असल्याचं बोललं जातंय. राज ठाकरे हे EVM विरोधात राष्ट्रीय पातळीवर आंदोलन उभं करण्याची चाचपणी करत आहेत. त्यासाठी ते भाजप आणि EVM ला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन करत आहेत. EVM विरोधी आंदोलनात सहभाग देण्यापर्यंत ठीक आहे, पण निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन जर राज ठाकरे यांनी सर्व विरोधी पक्षांना केलं तर त्या भूमिकेला त्या त्या राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळेल का? असाही प्रश्न निर्माण होतो.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...