मोठी बातमी! ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात सर्वात मोठा ट्विस्ट, ऐनवेळी शीवतीर्थावर…महत्त्वाच्या नेत्याच्या दाव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या!

वसंत मोरे यांनी राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला येण्याची शक्यता व्यक्त केलेली असली तरीही ठाकरे यांच्या शिवसेनेकडून तसेच मनसेकडून अद्याप याबाबत काहीही सांगितलेले नाही.

मोठी बातमी! ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात सर्वात मोठा ट्विस्ट, ऐनवेळी शीवतीर्थावर...महत्त्वाच्या नेत्याच्या दाव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या!
uddhav thackeray and dasara melava
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 20, 2026 | 4:56 PM

UBT Dasara Melava : मुंबईतीली शिवाजी पार्कमध्ये ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी केली जातेय. महाराष्ट्रभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल होत असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी शिवसैनिकांना काय संदेश देणार तसेच कोणती घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे यावेळी उद्धव ठाकरे रेजीम चेंजची घोषणा करण्याची शक्यता आहे, असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय. ठाकरेंच्या मेळाव्याची सध्या राज्यभरात चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचेच वसंत मोरे यांनी दिलेल्या माहितीने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी केलेला दावा सत्य ठरला तर ठाकरेंचा मेळावा ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.

वसंत मोरे यांनी नेमकी काय माहिती दिली?

वसंत मोरे यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी बोलताना आजच्या दसरा मेळाव्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे येऊ शकतात, असं सांगितलंय. “राज ठाकरे अचानक शिवतीर्थावर एंट्री मारू शकतात. अशी शक्यता आहे. राज ठाकरे जर आले तर विचारांचे सोने लुटले जाईल,” असं वसंत मोरे म्हणाले आहेत. सोबतच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यावरही टीका केलीय. शिवतीर्थवर होणारा दसरा मेळावा हा खरा आहे. नेस्को सेंटरमध्ये होणारा दसरा मेळावा हा गद्दरांचा आहे, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.

Loading...

नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष

वसंत मोरे यांनी राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला येण्याची शक्यता व्यक्त केलेली असली तरीही ठाकरे यांच्या शिवसेनेकडून तसेच मनसेकडून अद्याप याबाबत काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे वसंत मोरे यांनी सांगितल्यानुसार आजच्या दसरा मेवाळ्यात काही नवा ट्वीस्ट येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, यावेळच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार, याचा अंदाज लावला जात आहे. यंदाचा दसरा मेळावा हा संविधानाच्या संरक्षणार्थ असेल, असे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ते सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us