Raj Thackeray : सरकारने ही डॉक्युमेंट्री गायब करायच्या आधी बघून घ्या! राज ठाकरेंच्या नव्या सोशल मिडिया पोस्टने एकच खळबळ VIDEO

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहेत. त्यांनी एका डॉक्युमेंट्रीवरुन पोस्ट केली आहे. सरकारला ही डॉक्युमेंट्री समाजमाध्यमांवरून गायब करायची आहे. याचं कारण काय असेल ते तुम्हाला ही डॉक्युमेंट्री बघितल्यावर कळेलच असं त्यांनी लिहिलं आहे.

Raj Thackeray : सरकारने ही डॉक्युमेंट्री गायब करायच्या आधी बघून घ्या! राज ठाकरेंच्या नव्या सोशल मिडिया पोस्टने एकच खळबळ VIDEO
Raj Thackeray
| Updated on: Oct 22, 2026 | 10:00 AM

अक्षय मंकणी, प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नव्याने हल्लाबोल केला आहे. काल पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी पुढच्या 4 ते 5 महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होणार असं म्हटलं होतं.देश रस्त्यावर आला तरी मला आश्चर्य वाटणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. आज राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योजक गौतम अदाणी यांची डॉक्युमेंट्री फिल्म पोस्ट केली आहे. या डॉक्युमेंट्री फिल्मच्या संदर्भात एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरील अनेक अकाउंट धारकांना मुंबई पोलिसांनी ही डॉक्युमेंट्री हटवण्याच्या संदर्भात नोटीस देण्यात आली होती. या डॉक्युमेंट्रीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी उद्योजक गौतम अदाणी यांना कसा पाठिंबा देऊन, मदत करून त्यांना उद्योग क्षेत्रात मोठ केलं आणि त्यांचा फायदा आपल्या राजकारणासाठी केला याचा उल्लेख या डॉक्युमेंट्री मध्ये आहे. या सर्व प्रकरणानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून ही डॉक्युमेंट्री सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे.

सरकारला ही डॉक्युमेंट्री समाजमाध्यमांवरून गायब करायची आहे. याचं कारण काय असेल ते तुम्हाला ही डॉक्युमेंट्री बघितल्यावर कळेलच. त्यामुळे सरकारने ही डॉक्युमेंट्री गायब करायच्या आधी बघून घ्या ! असा राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर राज ठाकरे यांनी सरकार विरोधात आघाडीच उघडली आहे. जेन झी मतदारांना आपल्याकडे वळवून सरकारविरोधी वातावरण तापवण्यावर राज ठाकरे यांचा भर आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याच्या मागणीसाठी मोर्चा सुद्धा काढला होता.

Loading...

एका व्यक्तीच्या सांगण्यावरून बॅलेट पेपरवर निवडणूक होते, मग..

राज ठाकरे यांनी EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. काल पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, “देशातील निवडणुका पारदर्शकपणे झाल्या पाहिजेत. पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका नेपाळमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका होतात. अख्ख्या जगाने इव्हीएम नाकारलं आहे, मग भारतात इव्हीएस का? फ्रान्समध्ये एका व्यक्तीच्या सांगण्यावरून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात आली”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us