मनसेच्या विश्वविक्रमी दहीहंडीला ऐनवेळी परवानगी नाकारण्याच्या राजकारणामागे कोण? आयोजक गणेश चुक्कल यांनी अखेर नाव घेतलच

घाटकोपरमध्ये पोलिसांनी मनसे नेते गणेश चुक्कल यांच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतरही गणेश चुक्कल यांनी हंडीचे आयोजन केले. त्यानंतर भाजपवर गंभीर आरोप केला.

मनसेच्या विश्वविक्रमी दहीहंडीला ऐनवेळी परवानगी नाकारण्याच्या राजकारणामागे कोण? आयोजक गणेश चुक्कल यांनी अखेर नाव घेतलच
Ganesh chukkal news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 05, 2026 | 11:26 AM

मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक भागात दहीहंडीला सुरुवात झाली आहे. परंतु घाटकोपरमध्ये मनसे नेते गणेश चुक्कल यांच्या दहीहंडीला ऐनवेळी परवानगी नाकारली. दहीहंडीच्या स्टेजमुळे आपतकालीन मार्ग बंद होणार, असा अहवाल पोलिसांकडून पत्रात देण्यात आला. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी दहीहंडी होणार असा निर्धार दहीहंडी आयोजकांकडून करण्यात आला. जेन-झी दहीहंडी आयोजक गणेश चुक्कल यांनी पोलिसांच्या निर्णयावरून भाजपवर निशाणा साधला.

दहीहंडी उत्सवात जेन-झी पिढीच्या आंदोलनाला सलाम करण्यात येणार आहे. त्यामुळे ही परवानगी देऊन यांनी नाकारली आहे, असा आयोजकाचा आरोप आहे. आयोजक गणेश चुक्कल म्हणाले, ‘आमची हंडी पहिल्या वर्षी होत नाही. ही दरवर्षी होणारी हंडी आहे. अग्निशमन दल, महानगरपालिका, पोलीस ठाणे, वाहतूक या सर्वांनी परवानगी देऊनही परवानगी नाकारण्याचं पत्र आलं. पोलीस ठाण्याने पालिकेला स्टेज काढण्यास सांगितला. राजकीय दबावापोटी आणि दडपशाहीतून होत आहे. भाजपची हंडी लागली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून हंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. तिकडे मंत्री महोदय येणार असतील, त्यामुळे दडपशाहीतून पोलिसांनी नोटीस पाठवली असावी’.

भाजपवर गंभीर आरोप करताना म्हटलं की, माझ्याकडे अधिकृत माहिती नाही. परंतु कानोसा मिळत आहे. त्याच्यावरून लक्षात येत आहे की, आमच्या हंडीला चांगला प्रतिसाद आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या शहरातून 1 हजारांहून अधिक पथकांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी जय जवान सारख्या मोठ्या पथकाने दहा थर लावून विश्वविक्रम केला. दडपशाहीचा राजकीय हेतू आहे. पण आम्ही त्याला भीक घालत नाही’.

परवानगी कोणामुळे नाकारली?

चुक्कल यांनी आरोप करताना म्हटलं की, मुंबईमधील विश्वविक्रमी दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. पण आम्हाला ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारली. पण आम्ही दहीहंडी उत्सव करणार आणि त्यावर ठाम आहोत. या घाटकोपरच्या आमदारांनी मला त्रास दिला आहे. तशी माहिती मिळते आहे. कारण पहिल्यांदा आमच्या दहीहंडी उत्सवाला पोलीस आणि पालिकेने परवानगी दिली होती. पण यांच्या दबावाने ती नाकारली पण आमची दहीहंडी काय आजची नाही आहे’.

घाटकोपरमध्ये 51 लाखांची दहीहंडी

घाटकोपरमध्ये गणेश चुक्कल यांनी तब्बल 51 लाखांचं बक्षीस असलेल्या दहीहंडीचं आयोजन केलं. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. यंदा त्यांच्या दहीहंडी उत्सवात भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव, अभिनेता रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, रोहित माने, प्रतीक्षा कोते, मराठी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, क्रे टेक्स, (Japanese) परदेशी नागरिक हजेरी लावणार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us