AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dahi Handi 2026 : मुंबई, ठाण्यात कोट्यवधींच्या दहीहंडीची धूम, कुठे किती लाखांचं बक्षीस?

मुंबई, ठाण्यात कोट्यवधींच्या दहीहंडीची धूम पाहायला मिळणार आहे. या दहीहंडीसाठी सेलिब्रिटी देखील हजेरी लावणार आहेत.

Dahi Handi 2026 : मुंबई, ठाण्यात कोट्यवधींच्या दहीहंडीची धूम, कुठे किती लाखांचं बक्षीस?
DAHI HANDI news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 05, 2026 | 7:51 AM
Share

मुंबईसह ठाण्यात दहीहंडीचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आलं आहे. गोविंदा पथक मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुंबई, ठाण्यासहित इतर भागातही लाखांचं बक्षीस असलेल्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. एकीकडे पाऊस सुरू असताना सर्व गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत. विविध शहरात राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

दहीहंडी सणाला आता स्पर्धेचं स्वरुप आलं आहे. गोविंदा पथकाकडून यंदा नऊ किंवा दहा थर उभारण्याची शक्यता आहे. गेल्या महिनाभरापासून गोविंदा पथके दहीहंडीसाठी सराव करत होते. मुंबईसहित ठाण्यातही दहीहंडीचा जोरदार उत्साह पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दहीहंडी फोडणाऱ्या पथकासाठी लाखोंचं बक्षीस जाहीर केलं आहे. आमदार शिवाजीराव पाटील यांनी ठाण्यात दहीहंडीचं भव्यदिव्य आयोजन केलं आहे. त्यांनी या दहीहंडी महोत्सवात तब्बल 71 लाखांच्या बक्षि‍सांचं वाटप केलं जाणार आहे. सेलिब्रिटी दहीहंडी अशी विशेष ओळख या स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीची आहे. या दहीहंडीत प्रमुख राजकीय नेत्यांसहित सेलिब्रिटी देखील हजर राहण्याची शक्यता आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांनीही संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे दहीहंडीचं आयोजन केलं आहे. त्यांच्या दहीहंडीतून 21 लाख ते 51 लाखांपर्यंतच्या बक्षि‍सांचं वाटप केलं जाणार आहे. ठाण्यातील आमदार रविंद्र फाटक यांनीही दहीहंडीचं आयोजन केलं आहे. त्यांनी दहीहंडीसाठी 21 लाख रुपयांची घोषणा केली. तर दिघे यांच्या समर्थकांनी टेंभी नाका येथे दहीहंडीचं आयोजन केलं आहे. आयोजकांकडून दहीहंडी उत्सवात 11 लाख ते 25 लाखांहून अधिक रकमेची बक्षिसे दिली जाणार आहे. अविनाश जाधव यांच्या नौपाडा येथेही दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. नौपाड्यात 11 लाख ते 21 लाखांपर्यंत रुपयांची बक्षि‍सांचं वाटप केलं जाईल.

घाटकोपरमध्ये मनसेची 51 लाखांची हंडी

मुंबईच्या घाटकोपरमध्येही मनसेच्या गणेश चुक्कल यांनी दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. त्यांनी दहीहंडी फोडण्याऱ्यांसाठी 51 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. मनसेच्या या दहीहंडीला सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. घाटकोपरसहित वरळी, दादर, बोरिवली, चेंबूरमध्ये भव्यदिव्य दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाण्यात पोलिसांनी 254 दहीहंडी आयोजनाला परवानगी दिली आहे.

Follow Us
ठाकरे गटाला मुंबईत मोठा धक्का! विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी! ठाकरे गटाला मुंबईत मोठा धक्का! विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात