AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackrey Speech Live : यशवंत हो नाही, यशवंत जाधव हो म्हणतात, शिवसेनेच्या ‘मातोश्री’ फेम नेत्यावर राज ठाकरेंकडून फिरकी

पालिकेचे यशवंत जाधववर आयकरने रेड टाकली. दोन दिवस रेड होती. मोजत काय होते ? हल्ली आईवडील यशवंत हो सांगत नाहीत, यशवंत जाधव हो सांगतात. पालिकेत खा खा खाल्ले पैसे, कुठे आहे ती मुंबई ? व्हॉट्सअॅपवर जुन्या मुंबईचे फोटो येतात किती सुंदर वाटते. बीएसटीचा रंग बदलला. लोकं कसे चढतात. घाटकोपरला चाललोय की अहमदाबादला तिकिट काढेपर्यंत ? याचं कारण तुम्ही.

Raj Thackrey Speech Live : यशवंत हो नाही, यशवंत जाधव हो म्हणतात, शिवसेनेच्या 'मातोश्री' फेम नेत्यावर राज ठाकरेंकडून फिरकी
राज ठाकरे, अध्यक्ष, मनसेImage Credit source: TV9
| Updated on: Apr 02, 2022 | 10:03 PM
Share

मुंबई : हल्ली आईवडील यशवंत हो सांगत नाही, यशवंत जाधव (Yashwant Jadhav) हो सांगतात अशी टोला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लगावला आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी महापालिकेतील घोटाळ्यांचा चांगलाच समाचार घेतला. यशवंत जाधव आयकर धाड प्रकरणी राज ठाकरेंनी मातोश्री फेम नेत्याची चांगलीच फिरकी घेतली. याशिवाय मुंबईतील समस्यांचा पाढाही वाचला. हल्ली हे कटवरच चालतात. ह्याच्यावर कट, त्याच्यावर कट. ईडीने पण एक केला. मग मुख्यमंत्री संतापले. मुंबई महापालिकेचे यशवंत जाधव इनकम टॅक्सची रेड पडली त्यांच्यावर. दोन दिवस रेड होती. मोजत काय होते ? असा सवाल राज ठाकरेंनी केला. (MNS president Raj Thackeray’s criticism on Mumbai Municipal Corporation scam and Yashwant Jadhav)

मुंबई महापालिकेवरुन राज ठाकरेंचे शिवसेनेवर शरसंधान

पालिकेचे यशवंत जाधववर आयकरने रेड टाकली. दोन दिवस रेड होती. मोजत काय होते ? हल्ली आईवडील यशवंत हो सांगत नाहीत, यशवंत जाधव हो सांगतात. पालिकेत खा खा खाल्ले पैसे, कुठे आहे ती मुंबई ? व्हॉट्सअॅपवर जुन्या मुंबईचे फोटो येतात किती सुंदर वाटते. बीएसटीचा रंग बदलला. लोकं कसे चढतात. घाटकोपरला चाललोय की अहमदाबादला तिकिट काढेपर्यंत ? याचं कारण तुम्ही. बकालपणा आणताय आणा. विशेषतः मुंबईत. रस्त्यावरुन चालता येत नाही. ठीक खड्ड्यातून चालू आम्ही. गाडी चालवता येत नाही नको चालू दे. ही तुमची कमजोरी त्यांना सत्तेत आणते. हा बकालपणा मुंबईत आणला. मी कॉलेजला जात होतो. तेव्हा वांद्र्यावरून हार्बरने जात असे. कोर्टाच्या बाजूने उजवीकडे सात आठ झोपड्या होत्या. त्याला बेहराम पाडा म्हणायचे. आज जाऊन पाहा बेहराम पाडा. चार चार मजल्यांचा बेहरामपाडा. कुठे आहे तो बेहराम पाडा ? मातोश्रीवरून बाहेर पडल्यावर बेहराम पाडा. यांच्या हातात इतकी वर्ष महापालिका सत्ता आहे. काहीही घडलं नाही. बेहरामपाडा वाढत आहेत. तीच मुंब्राची स्थिती.

झोपडपट्टीतील मदरश्यांवर धाडी टाका

पंतप्रधानांना विनंती ईडीच्या धाडी टाकताना एकदा पोलिसांकडे सोर्स आहे. झोपडपट्टीतील मदरश्यांवर धाडी टाका. पाकिस्तानची गरज नाही. उद्या काही घडलं तर आवरता आवरता येणार नाही इतक्या गोष्टी आतमध्ये भरलेल्या आहेत. पण आमचं लक्ष नाही. आपल्याला मते हवीत. आम्ही झोपडपट्ट्या वाढवत आहोत. अनेक मशीदी आहे. त्यात काय चाललंय हे समजत नाही. हे पाकिस्तानच्या प्रोत्साहामुळे आलेले लोक आहे. आमच्या लोकांनी स्वीकारलेली लोकं आहेत. आमदार, नगरसेवक खासदारांना घेणं देणं नाही. आधार कार्ड आहे रेशनकार्ड आहे, हे घे आणि आमचीच मार. यांना सर्व गोष्टी पुरवणारे आमचेच. एक दिवस येईल सर्वांचे डोळे उघडतील हे काय करून ठेवलं. एकदा पोलिसांशी बोला. कानोसा घ्या. तुम्हाला धडकी भरेल. पण आमचं लक्ष नाही, असे राज ठाकरे म्हणाले. (MNS president Raj Thackeray’s criticism on Mumbai Municipal Corporation scam and Yashwant Jadhav)

इतर बातम्या

Raj Thackrey Speech : कितीही लाथा मारल्या ढुंगणावर, राज ठाकरेंनी, मलिक, भुजबळांची जेलवारी काढली

Raj Thackrey Speech : ‘राष्ट्रवादीनं दुसऱ्या जातीचा द्वेष करायला लावला’, राज ठाकरेंचा शरद पवारांवर पुन्हा थेट आरोप

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.