Sanjay Raut : कोकणात 900 कोटीच्या जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार, महान हिंदुत्ववादी मंत्री.. संजय राऊत यांच्या नव्या गौप्यस्फोटाने खळबळ

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी कोकणातल्या जमीन व्यवहारसंदर्भात नवीन गौप्यस्फोट केला आहे. वेंगुर्ला, सावंतवाडी, दोड मार्ग भागातील ही जमीन आहे. हा सर्व व्यवहार 900 कोटींचा असल्याचा राऊतांचा दावा आहे.

Sanjay Raut : कोकणात 900 कोटीच्या जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार, महान हिंदुत्ववादी मंत्री.. संजय राऊत यांच्या नव्या गौप्यस्फोटाने खळबळ
Sanjay Raut
| Updated on: Sep 28, 2026 | 11:40 AM

राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी आज नवीन गौप्यस्फोट केला. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपाचा नवीन सामना रंगू शकतो.”सिंधूदुर्गातील 900 कोटीची जमीन वेंगुर्ला, सावंतवाडी, दोड मार्ग या भागातली 900 कोटीची शेतजमीन, कृषी जमीन ही बंगळुरु, दिल्ली आणि हैदराबाद मधल्या धनिकांना बेकायदेशीर मार्गाने विकण्यात आली. जे शेतकरी नाहीत त्यांना ही जमीन विकण्यात आली” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. “महसूल खाते संपूर्ण व्यवहाराची गेल्या तीन वर्षांपासून चौकशी करत आहे. आता हा 900 कोटीचा व्यवहार जो आहे, महाराष्ट्रात तुकडे बंदी कायदा आहे म्हणजे शेत जमीन विकता येणार नाही. असं असताना कोकणातल्या या तीन तालुक्यातली जमीन विकायला काढली. जमिनीचा ताबा या बाहेरच्या लोकांनी घेतलाय” असा दावा संजय राऊत यांनी केला.

“कोकणाचे जे नेते आहेत मंत्रिमंडळात सिंधूदुर्गातले ते काय करतायत? ते त्यांचे पार्टनर आहेत. मंत्रिमंडळातले कोकणातले नेते या सगळ्या प्रकरणात परप्रांतीयांचा पार्टनर बनून व्यवहार करतायत. 900 कोटींचा व्यवहार झालेला आहे. जंगलतोड सुरु आहे. मी तिथे जाणार आहे. स्थानिक शिवसैनिकांसह जाऊन पाहणी करणार आहे” असं संजय राऊत म्हणाले.

मेंदू जागेवर असेल तर सगळ्यात आधी त्यांनी त्यांची नावं जाहीर करावीत

“काही काळापूर्वी जयंत पाटील यांनी हा विषय मांडला होता, तरीही व्यवहार थांबलेला नाही. सिंधूदुर्गातील हे व्यवहार थांबलेले नाहीत. माझ्याकडे सगळी माहिती आहे. कोणी किती पैसा कुठे गुंतवलाय. फडणवीसांचा मेंदू जागेवर असेल तर सगळ्यात आधी त्यांनी त्यांची नाव जाहीर करावीत. आतापर्यंतचे जमिनीचे व्यवहार कोणाच्या नावावर झालेले आहेत? त्या मागचा सूत्रधार कोण आहे? मंत्रिमंडळातला कोणता मंत्री आणि आणि आमदार दलाली करतोय या जमिनीची?” असे सवाल संजय राऊत यांनी विचारलेत.

900 कोटी हा काही सामान्य आकडा नाही

“आपल्या मंत्रिमंडळातला कोणता महान हिंदुत्ववादी मंत्री कोकणातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालण्याची दलाली करतोय. इस्टेट एजंट बनून काम करतोय. त्याला किती कोटींची दलाली मिळाली? हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला ऐकायचं आहे. कोण-कोण गुंतलं आहे? 900 कोटी हा काही सामान्य आकडा नाही. हे ऑन रेकॉर्ड आहे, ब्लॅक नी वेगळा” असे आरोप संजय राऊत यांनी केलेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us