Pravin Darekar | धनंजय शिंदे आणि भाई जगताप, नाना पटोलेंना अब्रू नुकसानीची नोटीस, प्रवीण दरेकर यांची माहिती

| Updated on: Apr 11, 2022 | 12:27 PM

मुंबै बँकेचा नफा 15 कोटी आणि दोन हजार कोटी रुपयांचा आरोप करता, तुमच्या पब्लिसिटीसाठी एखादी इन्स्टिट्यूशन बदनाम करता, हे योग्य नाही. त्यामुळे मी धनंजय शिंदे, भाई जगताप आणि नाना पटोलेंविरोधात अब्रू नुकसानीच्या नोटीसा पाठवल्या आहेत, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली.

Pravin Darekar | धनंजय शिंदे आणि भाई जगताप, नाना पटोलेंना अब्रू नुकसानीची नोटीस, प्रवीण दरेकर यांची माहिती
प्रवीण दरेकर यांची मुंबै बँक घोटाळा प्रकरणी चौकशी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई | मुंबै बँक घोटाळा प्रकरणी मला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पोलिसांच्या प्रश्नांना मी योग्य उत्तरं दिली. पण सरकारलाच मला छळायचं असेल म्हणून पुन्हा बोलावण्यात आलं असेल. आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत. माझ्याविरोधात हे षडयंत्र रचण्यात आलं असून आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे (Dhananjay Shinde), भाई जगताप आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात (Nana Patole) मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे, असा इशारा भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिला आहे. तशा नोटीसा निघाल्याही आहेत, असं दरेकर म्हणाले.  मुंबै बँक घोटाळ्या प्रकरणी आज पुन्हा एकदा प्रवीण दरेकर यांना चौकशीला सामोरं जावं लागलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रवीण दरेकर हे कामगार संस्थेचे सभासद होण्यासाठी पात्र नाहीत. तरीही त्यांनी मुंबै बँकेच्या संचालकपदासाठी कामगार मतदारसंघातून अर्ज भरला. ते बँकेचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी 2011 ते 2021 अशी 10 वर्षे संचालक पद भूषवले, असा आरोप सहकारी संस्था, मुंबईच्या सहनिबंधकांनी दिलेल्या आदेशाच्या आधारे आपचे नेते धनंजय शिंदे यांनी केला आहे.

‘मुंबै बँक घोटाळा हे माझ्याविरोधात षडयंत्र’

मुंबै बँक घोटाळ्याचा आरोप हा माझ्याविरोधात रचलेलं षडयंत्र आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले. आम आदमी पक्ष आणि सरकार व विरोधकांनी एकत्रित येत हा कट रचला आहे. मुंबै बँकेचा नफा 15 कोटी आणि दोन हजार कोटी रुपयांचा आरोप करता, तुमच्या पब्लिसिटीसाठी एखादी इन्स्टिट्यूशन बदनाम करता, हे योग्य नाही. त्यामुळे मी धनंजय शिंदे, भाई जगताप आणि नाना पटोलेंविरोधात अब्रू नुकसानीच्या नोटीसा पाठवल्या आहेत, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली.

सोमय्यांनी पळून जाण्याचं कारणच नाही..

किरीट सोमय्या देश सोडून पळून जातील, असा संशय शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. त्यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, सोमय्यांनी पळून जाण्याचं कारणच नाही. त्यांनी अटकपूर्व जामीसाठी अर्ज केला आहे. त्याचा निकाल येईपर्यंत पोलिसांसमोर जात नसावेत.

‘जयंत पाटलांनी मनसे-भाजपची चिंता करू नये’

मनसे आणि भाजपच्या युतीबाबत सुरु असलेल्या चर्चांबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांनी आरोप केलाय. भाजप मनसेचा वापर करून घेतंय, असं पाटील म्हणाले. यावर प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर म्हणाले, ‘जयंत पाटील यांनी मनसे आणि भाजप ची चिंता करू नये, भविष्यात जे व्हायचं असेल ते होईल. त्यांनी तीन पक्षाची काळजी करावी

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यावर प्रतिक्रिया काय?

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं, त्यावर प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर म्हणाले, कारवाई व्हायची असेल तर मुंबई पोलीस आयुक्त आणि सहआयुक्तांवर केली पाहिजे. प्रमुख व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे. थातूर मातूर कारवाई करून काही उपयोग नाही. या प्रकरणी डी सी पी नियुक्त का केला नाही? काय लागे बांधे होते? सरकारवमध्ये समनव्य नाही. जनतेसाठी काय केले पाहिजे, याच भानच सरकार ला नाही. त्यामुळे जतेला त्रास होत आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

इतर बातम्या-

लाँचिंगआधीच नवीन Maruti Alto ची झलक सादर, जाणून घ्या कारची संभाव्य किंमत आणि फीचर्स

Health Care Tips : उन्हाळ्यात हे ड्रायफ्रूट्स भिजवलेले खा आणि निरोगी राहा!