Praveen Darekar Vs MVA : समान निर्णय असेल तरच आंदोलन रद्द, भोंग्यावर प्रवीण दरेकरांचं सरकारला आव्हान, सरकार लांगुलचालन करत असल्याचा आरोप

भाजप आणि मनसे भोंग्यांचं राजकारण करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, नाना पटोलेंनी काँग्रेसचा पूर्व इतिहास तपासण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसच्या स्थापनेपासून कुणी कुणाचं लांगुलचालन केलंय, याची त्यांना कल्पना आहे.

Praveen Darekar Vs MVA : समान निर्णय असेल तरच आंदोलन रद्द, भोंग्यावर प्रवीण दरेकरांचं सरकारला आव्हान, सरकार लांगुलचालन करत असल्याचा आरोप
प्रवीण दरेकर यांचं महाविकास आघाडी सरकारला आव्हान
| Edited By: | Updated on: Apr 18, 2022 | 2:38 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी येत्या 03 मे पर्यंत मशिदींवरचे भोंगे (Loud Sperakers) हटवण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यानंतर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जाईल, अशा इशाराही दिला आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीदेखील राज ठाकरेंच्या या भूमिकेला पाठींबा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वांसाठी समान लागू झाला पाहिजे. त्यासाठीचे नियम आणखी कठोर केले तरी चालतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तसेच ठराविक धर्मियांचे लांगूलचालन करत सुप्रीम कोर्टाचा निर्णय पाळला जात नसेल तर त्या ठिकाणी कायदा हातात घेण्याचे स्टेटमेंट्स येतात. यावर मुख्यमंत्र्यांनी वेळीच निर्णय घ्यावा, असा इशारादेखील दरेकर यांनी दिला आहे.

काय म्हणाले प्रवीण दरेकर?

राज ठाकरेंच्या 03 मे रोजीच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर म्हणाले, ‘राज ठाकरे साहेब किंवा हिंदु धर्मियांची जी भावना आहे, त्या भावनेची कदर करत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी तंतोतंत केली आणि वेगळे नियम भोंग्यांसाठी लागू केले नाहीत. आणि दोन्ही धर्मियांसाठी समान नियम लागू केले नाहीत, तर अशी आवश्यकता पडणार नाही. कारण शेवटी उद्देश सफल होत असेल तर आंदोलनाची आवश्यकता पडणार नाही. ‘

मविआ सरकारला काय इशारा?

भाजप आणि मनसे भोंग्यांचं राजकारण करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, नाना पटोलेंनी काँग्रेसचा पूर्व इतिहास तपासण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसच्या स्थापनेपासून कुणी कुणाचं लांगुलचालन केलंय, याची त्यांना कल्पना आहे. आता त्या ठिकाणी हिंदु-मुस्लीम तेढ याची टीका ते करतायत. आता मात्र हिंदु जागे झालेत, हिंदू संघटिक झालेत. म्हणून राहुल गांधींसहित नानापर्यंत सगळ्यांची मंदिरात जाण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे. या देशात लांगुलचालन करत हिंदु-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करताना काँग्रेसची भूमिका जबाबदार आहे.

मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला तर अभिनंदनच करू…

मुख्यमंत्री आणि मविआ सरकारला इशारा देताना प्रवीण दरेकर म्हणाले, ‘ कायदा हा सर्वांसाठी समान असतो. काही धर्मियांचं लांगुलचालन होत असेल. मशिदीवर भोंगे लावले जात असतील. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचं पालन होणार असेल तर मग त्या ठिकाणी कायदा हातात घेतला जातो आणि रजा ठाकरे साहेबांसारखे स्टेटमेंट येत असतात. सुप्रीम कोर्टाची अंमलबजावणी करावी, एवढीच मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांशी बोलून यासंदर्भातील निर्णय घेतला तर आम्ही त्यांचं अभिनंदनच करू, अशी प्रतिक्रिया देऊन प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना खिंडित पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

इतर बातम्या-

जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात रहा…iPhone 14 ला ‘अशी’ मिळेल कनेक्टिव्हिटी

Ranbir Alia Wedding Gifts: करीनाकडून डायमंड नेकलेस तर नीतू कपूर यांच्याकडून 6BHK फ्लॅट; रणबीर-आलियाला मिळाले ‘हे’ महागडे गिफ्ट्स