Maneka Gandhi : कबुतरखाना बंदीमुळे मनेका गांधींचा संताप, म्हणाल्या कबुतरांपेक्षा जास्त धोकादायक, तर…

Maneka Gandhi : "केरळमध्ये त्यांनी सर्व रानडुकरांना मारण्याचा निर्णय घेतला आहे,जर असे झाले तर पाच वर्षात केरळमध्ये एकही झाड शिल्लक राहणार नाही. जर तुम्ही रानडुकरांना मारले तर 190 सिंह बाहेर येतील"

Maneka Gandhi : कबुतरखाना बंदीमुळे मनेका गांधींचा संताप, म्हणाल्या कबुतरांपेक्षा जास्त धोकादायक, तर...
Maneka Gandhi
| Updated on: Sep 13, 2025 | 1:23 PM

कबुतरखाना बंदीमुळे मनेका गांधी संतापल्या आहेत. मनेका गांधी म्हणाल्या की, फटाके कबुतरांपेक्षा जास्त धोकादायक असतात. भाजप नेत्या मनेका गांधी यांनी मुंबईत कबुतर खान्यावर बंदी घालण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. पर्यावरणाबाबत सरकारवर निशाणा साधला.  “कोणता देश जिवंत राहील आणि कोणता देश मरेल, कोणाची जंगले तोडली जातील, कोण चांगले करेल आणि कोण वाईट करेल हे पर्यटक ठरवतात. भारतातील पर्यटन हे अगदी लहान देशांपेक्षाही कमी आहे आणि आपण अधिक हॉटेल्स आणि रस्ते बांधण्याचा विचार करतो, परंतु आपण जितके जास्त झाडे तोडू आणि प्राणी मारू तितके कमी पर्यटक येतील” असं मनेका गांधी म्हणाल्या.

‘गेल्या 10 वर्षांत 21 लाख हेक्टर जंगल तोडण्यात आलं आहे. जंगलात काय उरलं आहे?’ असं त्या म्हणाल्या.
चारधाम यात्रेवरूनही त्यांनी टीका केली. “मला वाटतय की देवही पळून गेला आहे. सगळं चार धाम काँक्रीटने भरलं आहे. आता तिथे गेल्यावर माझं मन तुटेल” असं त्या म्हणाल्या.

कबुतराने आजपर्यंत कधीही कोणाचे नुकसान केलेले नाही

“आपण प्राण्यांना खायला देऊ किंवा देऊ नये, त्यांना पाहू किंवा पाहू नये, पण प्रत्येकाच्या मनात हे असते की आपण जगले पाहिजे आणि त्यांनी जगले पाहिजे. कबुतराने आजपर्यंत कधीही कोणाचे नुकसान केलेले नाही. जगात त्याच्यामुळे कोणीही मरण पावले नाही. मुंबईत 57 कबुतरखाना आहेत,चार-पाच कबुतरखाना तोडले. मुख्यमंत्र्यांनी एक समिती स्थापन केली आहे आणि जेव्हा ती समिती आपला मत देईल तेव्हा कबुतरखाना पुन्हा एकदा बांधला जाईल” असं मनेका गांधी म्हणाल्या.

जर तुम्ही रानडुकरांना मारले तर 190 सिंह बाहेर येतील

“केरळमध्ये त्यांनी सर्व रानडुकरांना मारण्याचा निर्णय घेतला आहे, जर असे झाले तर पाच वर्षात केरळमध्ये एकही झाड शिल्लक राहणार नाही. जर तुम्ही रानडुकरांना मारले तर 190 सिंह बाहेर येतील.मग तुम्ही त्यांना कधीपर्यंत मारणार किंवा मृत्यू संपेल आणि लोक केरळला का जातील?” असं मनेका गांधी म्हणाल्या.

आता फटाक्यांचा काळ गेला

“कबुतरांपेक्षा फटाक्यांमुळे लाखों लोक मरतात. तुम्ही याला राजकीय मुद्दा बनवला आहे.हिंदू फटाके फोडतील असे नाही, हा राम-सीतेचा सण आहे आणि राम-सीतेच्या काळात फटाके नव्हते. जर तुम्ही फटाके बनवणारे कारखाने बंद केले नाहीत तर ते कसे बंद कराल? फटाके कारखाने बंद करायचे की नाही हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवावे.एक काळ असा होता, जेव्हा मुंबईत घोडागाड्या धावायच्या पण त्या थांबल्या आहेत, आता फटाक्यांचा काळ गेला आहे” असं मनेका गांधी म्हणाल्या.