मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना सत्र न्यायालयाने ठोठावला ३०० रुपयांचा दंड, काय नेमके प्रकरण ?

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना एका जुन्या प्रकरणात सत्र न्यायालयाने तीनशे रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना सत्र न्यायालयाने ठोठावला ३०० रुपयांचा दंड, काय नेमके प्रकरण ?
Mumbai Mayor Ritu Tawde
| Edited By: | Updated on: Sep 23, 2026 | 11:54 PM

२०१६ च्या शिक्षक मारहाण प्रकरणात गेल्या अनेक सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्याने मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना सत्र न्यायालयाने तीनशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. गेल्या सुनावणीस त्या उपस्थित न राहिल्याने शेवटची संधी म्हणून त्यांना वैयक्तिक उपस्थितीतून सूट देण्यात आली होती. मात्र त्यानंतरच्याही सुनावणीत रितू तावडे आणि अन्य काही आरोपी कोर्टात गैरहजर राहून वारंवार उपस्थितीतून सूट मिळण्यासाठी अर्ज दाखल करत असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.

न्यायालयात उपस्थितीतून सूट मिळण्यासाठी रितू तावडे यांनी नव्याने दाखल केलेला अर्ज मंजूर करतानाच सत्र न्यायालयाने प्रत्येकी 300 रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. २९ जुलै २०२६ रोजी वाकोला येथील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत शिक्षकाला मारहाण प्रकरणी रितू तावडे आणि अन्य सात जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी आरोप निश्चिती झाली असून साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सध्या सत्र न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात रितू तावडे यांनी न्यायालयीन सुनावणीस अनुपस्थित राहण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला होता. हा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आणि या प्रकरणातील तिन्ही आरोपींवर तीनशे रुपयांचा दंड सुनावला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us