AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Effect : कोरोनाच्या भीतीने विद्यार्थी चालले गावाला, खासगी बसेसकडून प्रवाशांची लूट

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्यानं वाढत (mumbaikar shifted village due to corona) आहे. महाराष्ट्रात काल (17 मार्च) कोरोनाचा पहिला बळी मुंबईमध्ये गेल्याने लोकांमध्ये भित्ती निर्माण झाली आहे.

Corona Effect : कोरोनाच्या भीतीने विद्यार्थी चालले गावाला, खासगी बसेसकडून प्रवाशांची लूट
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Mar 18, 2020 | 8:16 AM
Share

नवी मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्यानं वाढत (mumbaikar shifted village due to corona) आहे. महाराष्ट्रात काल (17 मार्च) कोरोनाचा पहिला बळी मुंबईमध्ये गेल्याने लोकांमध्ये भित्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेकडो प्रवाशी आपल्या परिवारासोबत गावी निघाले आहेत. तीन ते चार तास एसटी महामंडळाच्या बसेस नसल्याने खासगी बसेसने लोक गावी जात आहेत. पण खासगी बसेस दरोरजपेक्षा अधिक प्रवास भाडे घेत आहेत. त्यामुळे लोकांना याचा फटका बसत आहे. सातारा,कराड जाण्यासाठी 300 रुपये लागतात पण सध्या प्रवाशांकडून 500 ते 700 रुपये घेतले (mumbaikar shifted village due to corona) जात आहेत.

वाशी ते बेलापूरपर्यंत संधाकाळी 6 वाजल्यापासून लोकांनी गावी जाण्यासाठी हायवेवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मिळेल त्या बसेसने लोक गावी जात होते. राज्यात कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून अत्यावश्यक सेवा वगळून शाळा, महाविद्यालय आणि खाजगी कंपन्या यांनी सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, प्रवाशी मोठ्या प्रमाणात आपल्या परिवारसोबत गावी जात आहेत.

प्रवाशी गावी जात असल्यामुळे अधिक बस गाड्या सोडण्याची आवश्यकता होती. अधिक गाड्या नसल्याने खासगी बसेस प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट करत आहेत. यावर परिवहन मंत्री कारवाई करतील का असा प्रश्न नागरिकांनी केला.

दरम्यान, राज्यात कोरोना दिवसेंदिवस फोफावत चालला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 41 वर पोहोचली आली. कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे.

संबधित बातम्या : 

नाशिकमध्ये कोरोनाची लागण झाल्याची अफवा, दोघांविरोधात गुन्हा दाखल
Corona Effect | मुंबईतील ऑर्केस्टा, पब आणि डान्सबार 31 मार्चपर्यंत बंद, मुंबई पोलिसांचे आदेश
Corona Update | 40 पैकी 7 जणांमध्ये तीव्र लक्षणे, 32 जणांमध्ये लक्षणे नाहीत, कोरोनाची सद्यस्थिती काय?

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ