मुंबईतील 11 चाळींचा पुनर्विकास होणार, मराठी माणसाला मिळणार हक्काचं घर?; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा नेमकी काय?

मुंबईतील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळच्या (NTC) नऊ गिरण्यांच्या जमिनींवर असणाऱ्या 11 चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर खुला झाला आहे. म्हाडामार्फत राज्य सरकार या चाळींचा पुनर्विकास करणार आहे.

मुंबईतील 11 चाळींचा पुनर्विकास होणार, मराठी माणसाला मिळणार हक्काचं घर?; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा नेमकी काय?
पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jan 15, 2023 | 8:07 PM

मुंबई : मुंबईत (Mumbai) राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळच्या (एनटीसी) एकूण 11 गिरण्या आहेत. या गिरण्यांच्या जागांवर असणाऱ्या चाळींची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मुंबई महापालिकेने या चाळींना धोकादायक जाहीर केले आहे. पण यांच्या पुनर्विकासाचे कोणतेही धोरण नसल्याने पुनर्विकास रखडला होता. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार (Ashish Shelar) याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाशी संपर्क केला. या चाळीचा पुनर्विकास 33(7 ) होणे अपेक्षित होते. मात्र जमीन केंद्र सरकारच्या मालकीची असलेल्याने केंद्र सरकारने त्याबाबत राज्य शासनला परवानगी देणे आवश्यक होते. त्यासाठी आशिष शेलार पाठपुरावा करीत होते. केंद्रीय मंत्र्यांना भेटून याबाबत निवेदनही त्यांनी दिले होते.

या चाळींपैकी काही चाळींची जागा मिलमध्येच होती. त्यामुळे त्यांची सीमा निश्चित करणे आवश्यक होते. तर यातील काही चाळी या उपकार प्राप्त नाहीत. त्यामुळे या सगळ्या इमारतीच्या पुनर्विकासात अनेक अडचणी होत्या.

Loading...

समिती गठीत करण्यात येणार

आज केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. या चाळींच्या पुनर्विकासाची योजाना तयार करून सादर करा. केंद्र सरकार त्याला मंजुरी देईल, असे सांगितले. त्यासाठी एक समिती ही गठीत करण्यात आली आहे. त्यामुळे या चाळींच्या पुनर्विकासाचे मार्ग खुले झाले आहेत.

या चाळींमध्ये 1 हजार 892 कुटुंब

या चाळींमध्ये सुमारे 1 हजार 892 कुटुंब आहेत. गिरणी कामगारांची मराठी कुटुंब आहेत. त्यामुळे त्यांना त्याच जागी हक्काचे घर मिळायला हवे अशी आमची भूमिका आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. म्हाडा मार्फत या रहिवाशांना घरे मिळतील.

11 चाळींचा पुनर्विकास होणार

मुंबईतील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळच्या (NTC) नऊ गिरण्यांच्या जमिनींवर असणाऱ्या 11 चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर खुला झाला आहे. म्हाडामार्फत राज्य सरकार या चाळींचा पुनर्विकास करणार आहे.

मुंबईतील मराठी माणसाला हक्काचे घर देणारी घोषणा आज केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी केली. त्यामुळे भाजपाच्या पाठपुराव्याला मोठे यश आले. अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us