AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्या विरोधात मोठी कारवाई, सुधीर तांबे म्हणतात, आम्ही भूमिका स्पष्ट करू

सुधीर तांबे म्हणाले, प्रचारात व्यस्त आहे. मुलाच्या प्रचारासाठी अनेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे हे १८ जानेवारीला भूमिका स्पष्ट करणार आहेत.

काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्या विरोधात मोठी कारवाई, सुधीर तांबे म्हणतात, आम्ही भूमिका स्पष्ट करू
सुधीर तांबे
| Edited By: | Updated on: Jan 15, 2023 | 7:35 PM
Share

मुंबई : सुधीर तांबे यांचं काँग्रेस पक्षाकडून निलंबन करण्यात आलं आहे. उमेदवारी देऊनही सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळं सुधीर तांबे यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. सुधीर तांबे हे सत्यजित तांबे यांचे वडील आहेत. काँग्रेसकडून सुधीर तांबे यांचे निलंबन करण्यात आले आहे. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांच्यावर काँग्रेसकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाची उमेदवारी सुधीर तांबे यांना देण्यात आली होती. पंरतु,त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला नाही. उलट त्यांचा मुलगा सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळं काँग्रेसची अडचण झाली.

चौकशीही केली जाणार

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी हायकमांडला यासंदर्भातील अहवाल पाठविला होता. त्यानंतर शिस्तपालन समितीची ही कारवाई करण्यात आली आहे. सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्याविरोधात चौकशीही केली जाणार आहे. अधिकृत उमेदवार असताना त्यांनी अर्ज भरला नव्हता.

महाविकास आघाडीची रात्री बैठक

दुसरीकडं महाविकास आघाडीच्या नेत्यांची व्हिडीओ कान्फरन्सिंगद्वारे आज रात्री बैठक पार पडणार आहे. नाशिकमधील निवडणुकीबाबत यासंदर्भात रणनीती ठरणार असल्याची माहिती आहे. नागपूरमध्ये काँग्रेस कुणाला पाठिंबा देणार यावरही चर्चा होणार आहे. जयंत पाटील, नाना पटोले, सुभाष देसाई, अभिजित वंजारी या बैठकीत सहभाग घेणार आहेत.

सत्यजित तांबे यांना भाजपचा एबी फार्म मिळणार?

काय घडामोडी होतात त्यापेक्षा निवडणूक महत्त्वाची आहे, अशी प्रतिक्रिया सुधीर तांबे यांनी दिली. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे हे १८ जानेवारीला भूमिका स्पष्ट करणार आहेत. नाशिकमध्ये भाजपचा एबी फार्म कुणाला मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांनी भाजप एबी फार्म देतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बावनकुळे म्हणतात, अजून कुणी पाठिंबा मागितला नाही

अजूनही आम्हाला कुणीही पाठिंबा मागितला नसल्याचं भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं. सुधीर तांबे हे प्रचारात व्यस्त आहेत. ते मुलाच्या प्रचारासाठी अनेकांच्या भेटीगाठी घेत आहेत.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.