AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात सातव्या वेतन आयोगाला मंजुरी, 1 जानेवारीपासून लागू

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सातव्या वेतन आयोगाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. नववर्ष अर्थात 1 जानेवारीपासून वेतनवाढ लागू होणार आहे. राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी यापूर्वीच हिवाळी अधिवेशनात याबाबतची घोषणा केली होती, त्यावर आज शिक्कामोर्तब झालं.  या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर तब्बल 21 हजार कोटींचा बोजा पडणार आहे. तर सातव्या वेतन आयोगाचा […]

राज्यात सातव्या वेतन आयोगाला मंजुरी, 1 जानेवारीपासून लागू
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM
Share

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सातव्या वेतन आयोगाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. नववर्ष अर्थात 1 जानेवारीपासून वेतनवाढ लागू होणार आहे. राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी यापूर्वीच हिवाळी अधिवेशनात याबाबतची घोषणा केली होती, त्यावर आज शिक्कामोर्तब झालं.  या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर तब्बल 21 हजार कोटींचा बोजा पडणार आहे. तर सातव्या वेतन आयोगाचा लाभ 17 लाखांपेक्षा अधिक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होणार  आहे. यापूर्वी आधी गणेश चतुर्थीला, मग दिवाळीत सातवा वेतन आयोग लागू होईल असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र आजपर्यंत सातवा वेतन आयोग लागू झाला नाही. आता त्याला 1 जानेवारीचा मुहूर्त मिळाला आहे.

सातवा वेतन आयोग लागू केल्यास, राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल. यामध्ये शासकीय, जिल्हा परिषद कर्मचारी, अधिकारी, पोलीस, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

2016 पासूनचा सातवा वेतन आयोग लागू केला जाणार असून, तीन वर्षांची थकबाकी टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. 38 हजार 655 कोटीची थकबाकी आहे.

कर्मचाऱ्यांचे किमान निवृत्ती वेतन 7500 रूपये होईल. 7 ते 14 हजार रुपये सरासरी पगार वाढणार असून, राज्य सरकारवर 21 हजार कोटींचा बोजा पडणार आहे.

दुसरीकडे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासूनच सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. पण अजूनही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचे लाभ मिळाले नाहीत. आता 1 जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. वेतन आयोग लागू करताना थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये जमा होईल, असं सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी सांगितलं होतं.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ