सोमवारपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 8 अतिरिक्त फेऱ्या

| Updated on: Jun 18, 2022 | 11:08 AM

पश्चिम रेल्वेवर थंडा थंडा कूल कूल एसी लोकलची वाढती लोकप्रियता पाहून येत्या सोमवारपासून तिच्या फेन्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 8 अतिरिक्त फेऱ्या
Railway Ticket For kids
Image Credit source: (Image Google)
Follow us on

मुंबई : पश्चिम रेल्वेवर (Western Railway) येत्या सोमवार, 20 जूनपासून – एसी लोकलच्या (AC Local) अतिरिक्त 8 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलच्या फेऱ्यांची संख्या आता 40 इतकी होणार आहे. नव्या 8 एसी फेऱ्यांमध्ये चार अप आणि चार डाऊन फेऱ्यांचा समावेश असणार असून सोमवार ते शुक्रवारदरम्यान या फेन्या चालविण्यात येणार आहेत.पश्चिम रेल्वेवर थंडा थंडा कूल कूल एसी लोकलची वाढती लोकप्रियता पाहून येत्या सोमवारपासून तिच्या फेन्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

8 एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय

20 जूनपासून आठ अतिरिक्त एसी लोकलच्या फेऱ्या चालविण्यात येणार असून त्या सोमवार ते शुक्रवारदरम्यान धावतील. शनिवार आणि रविवारी 32 फेऱ्या एसी लोकलच्या तर 8 फेऱ्या नॉन एसी लोकलच्या असतील. एसी लोकलच्या तिकीट दरात 50 टक्के कपात केल्यानंतर, मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. मात्र, लोकलच्या फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना एसी लोकलचा वापर करणे कठीण होत होते. यावर तोडगा म्हणून आता प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वेने  20 जूनपासून आणखी 8 एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

एकूण फेऱ्यांची संख्या आता 40

आठ जादा एसी फेन्यांपैकी चार फेऱ्या अप आणि चार फेऱ्या डाऊन मार्गावर चालविल्या जातील. अप दिशेला चर्चगेटच्या दिशेने विरार ते चर्चगेट, विरार ते दादर, वसई ते चर्चगेट आणि मालाड ते चर्चगेटदरम्यान प्रत्येकी एक तर डाऊन दिशेला विरारच्या दिशेने दादर ते विरार, चर्चगेट ते विरार, चर्चगेट ते वसई आणि चर्चगेट ते मालाडदरम्यान प्रत्येकी एक फेरी चालविण्यात येतील, असे पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले. एकूण फेऱ्यांची संख्या आता 40 होणार

हे सुद्धा वाचा

 

तिकीट दर घटल्यानंतर गर्दी वाढली

5 मेपासून एसी लोकलच्या तिकिटांचे दर कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. पश्चिम रेल्वेवर 16 मे पासून 12 अतिरिक्त एसी लोकल सुरू करण्यात आल्या आहेत. तर 20 जूनपासून 8 अतिरिक्त एसी लोकल चालविण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.