Aaditya Thackeray reply Disha : ‘सेम टू यू’, दिशा पटाणीला आदित्य ठाकरेंचा रिप्लाय

अभिनेत्री दिशा पटाणीने दिलेल्या शुभेच्छांवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आभार व्यक्त (Aaditya Thackeray reply to Disha) केले आहेत.

Aaditya Thackeray reply Disha : 'सेम टू यू', दिशा पटाणीला आदित्य ठाकरेंचा रिप्लाय

मुंबई : अभिनेत्री दिशा पटाणीने दिलेल्या शुभेच्छांवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आभार व्यक्त (Aaditya Thackeray reply to Disha) केले आहेत. आदित्य ठाकरे यांचा काल (13 जून) वाढदिवस होता. त्यानिमित्ताने दिशा पटाणीने ट्वीट करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिच्या ट्वीटला आता आदित्य ठाकरे यांनी उत्तर देत आभार व्यक्त केले. याशिवाय आदित्य ठाकरे यांनी दिशा पटाणीला देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सेम टू यू म्हटले. विशेष म्हणजे काल दिशाचाही वाढदिवस (Aaditya Thackeray reply Disha) होता.

आदित्य ठाकरेंनी दिशाच्या ट्वीटला उत्तर दिल्याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर दिशा पटाणी आणि आदित्या ठाकरे या दोघांच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

आदित्य ठाकरे यांच्यासोबत डिनरमुळे दिशा पटाणी गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. दिशाने काल 28 वा वाढदिवस साजरा केला. तर आदित्य ठाकरेंचा काल 30 वा जन्मदिवस होता. दोघांच्या मैत्रीविषयी कुणीही उघडपणे बोलत नसलं, तरी अनेक पत्रकार आदित्य ठाकरे यांना “आपल्या आयुष्याला नवी ‘दिशा’ कधी मिळणार?” असे आडूनआडून प्रश्न विचारात गुगली टाकतात.

“वाढदिवसाच्या शुभेच्छा, आहेस तसाच अमेझिंग राहा आणि चमकत राहा” अशा आशयाचे ट्वीट दिशा पटाणीने काल केले आणि पुन्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या.

दिशा पटाणीचा हटके अंदाज

दिशा पटाणी एम एस धोनीवरील चित्रपटातून बॉलीवूडमध्ये आली. तिचे बागी, भारत, मलंग असे मोजके चित्रपट गाजले. मात्र दिशा कधी तिच्या हटके लूकमुळे, कधी कपड्यांमुळे, तर कधी अभिनेता टायगर श्रॉफमुळे चर्चेत असते. ट्विटर, इन्स्टाग्रामवर दिशा तिचे फोटो शेअर करत असते. त्यावरुन तिच्याबद्दल सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु असते.

अभिनेता टायगर श्रॉफसोबतच्या कथित अफेअरबाबत ती चर्चेत होती. अशातच दिशा आदित्य ठाकरे यांच्यासोबत डिनरला गेल्याचे फोटो गेल्या वर्षी सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर चर्चेला उधाण आलं. दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने एकत्र सेलिब्रेशन करणार का, अशा प्रश्नांना गेल्या वर्षापासून ऊत आला.

खरं तर दिशा पटाणीचं नाव कायमच अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत जोडलं गेलं. मात्र, या दोघांनी कधीच त्यांच्यातील नात्याला दुजोरा दिला नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील चर्चा केवळ ‘गॉसिप्स’च राहिली.

संबंधित बातम्या : 

Aaditya Thackeray Birthday | स्वतःच्या वाढदिवशी दिशा पटाणीचे आधी आदित्य ठाकरेंना बर्थडे ट्वीट

पायाला गॅंगरीन, थंडी-तापाने फणफणणारा रुग्ण रस्त्यावर, एका ट्विटवर 20 मिनिटात आदित्य ठाकरेंकडून रुग्णाला मदत

Published On - 11:07 am, Sun, 14 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI