AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेट्रो कारशेडसाठी अंधारात झाडं कापण्यास सुरुवात

आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकरणी सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आज (4 ऑक्टोबर) आरेतील झाडांची कत्तलही सुरु झाली (Bombay HC dismisses all Aarey pleas). संध्याकाळी सातच्या सुमारास झाडे तोडायला सुरुवात करण्यात आली (Aarey tree cutting). अंधारात झाडं कापली जात असल्याचं स्थानिक नागरिकांना कळताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी दाखल झाले.

मेट्रो कारशेडसाठी अंधारात झाडं कापण्यास सुरुवात
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Oct 05, 2019 | 12:03 AM
Share

मुंबई : आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकरणी सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आज (4 ऑक्टोबर) आरेतील झाडांची कत्तलही सुरु झाली (Bombay HC dismisses all Aarey pleas). संध्याकाळी सातच्या सुमारास झाडे तोडायला सुरुवात करण्यात आली (Aarey tree cutting). अंधारात झाडं कापली जात असल्याचं स्थानिक नागरिकांना कळताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नागरिकांमधील असंतोष पाहायला मिळाला (Aarey tree cutting). झाडांच्या कत्तलीवरुन नागरिक इतके संतप्त झाले की घटनास्थळी पोलिसांनी बोलवावे लागले.

आरेमधील झाडे वाचवण्यासाठी पोलीस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. काही नागरिकांनी झाडे तोडली जाऊ नये यासाठी कारशेडच्या आत घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कुणालाही आत जाऊ दिले नाही. सध्या आरे कॉलनीतील मोठ्याप्रमाणात पर्यावरण प्रेमींची गर्दी झाली आहे.

यावेळी ‘आरे वाचवा’चे नारेही देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात अपील करण्याआधीच झाडे तोडल्याने नागरिकांनी सरकार, एमएमआरसीएल (MMRCL) विरोधात संताप व्यक्त केला आहे. आरेतील झाडे तोडली जात असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचली. त्यानंतर सोशल मीडियावरही सरकारच्या या कृत्यावर पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.

वृक्ष प्राधिकरणाने महानगरपालिकेच्या वेबसाइटवर आज म्हणजेच 4 ऑक्टोबरला आदेशाची प्रत अपलोड केली. त्यामुळे झाडे कापण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी मिळणं अपेक्षित होतं. मात्र, एमएमआरसीएलने त्याआधीच झाडे कापायला सुरुवात केली. पर्यावरणप्रेमी झोरु भथेना (Zoru Bhathena) व ‘वनशक्ती’ (Vanshakti) स्वयंसेवी संस्थेने कारशेडबाबत दाखल केलेल्या सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळल्या (Bombay HC dismisses all Aarey pleas) आहेत. त्यामुळे मेट्रो कारशेड आरे कॉलनीमध्येच होण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

मुंबई वृक्ष प्राधिकरणाने वृक्षतोडीसाठी दिलेली परवानगी वैध आहे का? आरे कॉलनी हे वनक्षेत्र आहे का? तसेच मेट्रो कारशेडची उभारणी मिठी नदीच्या पूरक्षेत्रात होत आहे की नाही? अशाप्रकारच्या चार याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. गेल्या 2 महिन्यांपासून याप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु होती. याप्रकरणी 30 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र त्यावेळी कोर्टाना निकाल राखून ठेवत 4 ऑक्टोबरला सुनावणी केली जाईल असे स्पष्ट केले होते.

याप्रकरणी शुक्रवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने चारही याचिका फेटाळून लावल्या आहेत. एका प्रकरणी कोर्टाने याचिकाकर्ते यांना दंडही ठोठावला आहे. तसेच नगरसेवक यशवंत जाधव यांनाही याप्रकरणी (Bombay HC dismisses all Aarey pleas) दंड ठोठावला आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. मेट्रो कारशेडसाठी वृक्ष तोडीसाठी अनेकांनी विरोध केला होता. त्यानंतर कोर्टाने सुनावणीदरम्यान 30 सप्टेंबरपर्यंत मेट्रो कारशेडसाठी आरेतील एकही झाड कापू नये असे आदेश दिले होते.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरे कॉलनीतील वृक्षतोडीला शिवसेनेने विरोध दर्शवला होता. जे नाणारचं झालं तेच आरे चं होणार अशा कठोर शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरेबाबत आपली भूमिका (Bombay HC dismisses all Aarey pleas) स्पष्ट केली होती. त्यानंतर सर्व पर्यावरण प्रेमी याबाबत एकवटले होते. स्थानिक रहिवाशांनीही आंदोलने करत वृक्षतोडीला विरोध केल्याने एमएमआरसी आणि पालिकेची कोंडी झाली होती.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली