दुकानाबाहेर बेवारस बॅग, पोलीस धावले, मुंबईत मोठी खळबळ
मुंबईच्या भुलेश्वर परिसरात एक बेवारस बॅग सापडली आहे. ज्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तपास सुरू आहे. बॉम्बशोधक पथकाकडून तपास केला जात आहे. मुंबई पोलिस अलर्ट मोडवर आहेत.

मुंबईचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत एका दुकानाच्या बाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताच पोलीसही अलर्ट झाले आहेत. पोलीस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली आहे. बॉम्ब निरोधक पथकाला पाचारण करण्यात आलं असून पथक येईपर्यंत हा परिसर सील करण्यात आला आहे. मुंबईच्या भुलेश्वर परिसरात एक बेवारस बॅग सापडली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या बॅगेबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एका दुकानाबाहेर ही बॅग ठेवण्यात आली. बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधक पथकाकडून बॅगची तपासणी करण्यात आली. या बॅगेबद्दल पोलिसांनी परिसरातील नागरिकांनी माहिती दिली.
वर्दळीच्या ठिकाणी बेवारस बॅग मिळाल्याने खळबळ..
मुंबईचा हा भुलेश्वर परिसर अत्यंत वर्दळीचा परिसर आहे. याच परिसरात ही बॅग सापडल्याने तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या. ही बॅग नक्की कोणी आणून ठेवली, याचाही शोध घेतला जात आहे. मोठ्या संख्येने पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून पूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे. याबाबत बोलताना पोलिसांनी म्हटले की, अगोदर आम्ही तपास करत आहोत.
मुंबई पोलिस घटनास्थळी दाखल
मुंबई पोलिस खात्यातील महत्वाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांचे प्रत्येक परिस्थितीवर बारीक नजर आहे. नागरिकांना या परिसरात न थांबण्याच्या सूचनाही पोलिसांकडून दिल्या गेल्या. पोलिसांनी काही वेळातच पूर्ण परिसर रिकामा केला. भुलेश्वर मार्केट परिसरात सापडलेली बॅग पूर्णपणे रिकामी असल्याची माहिती मिळत आहे. बॅगेत काहीही आढळले नसल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाले.
बॉम्बशोधक पथकाकडून तपासणीला सुरूवात
इतक्या वर्दळीच्या परिसरात अशाप्रकारे बेवारस बॅग सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेने मुंबई अलर्ट मोडवर आहे. पोलिस सर्तक झाले आहेत. मुंबईचा भुलेश्वर परिसर म्हणजे अत्यंत वर्दळीचा आहे. तिथे लोकांची मोठ्या संख्येने गर्दी असते. एका अज्ञात इसमाने रिकामी बॅग ठेवली असल्याचे आले समोर. बॅगमध्ये काहीही नसून बॅग पूर्ण रिकामी..