AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्दीतले व्हिडीओ पोस्ट करण्यास बंदी, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय; अन्यथा…

अनेकदा सोशल मीडियावर आपण पोलिसांचे वर्दीतील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. हे व्हिडीओ 'खाकी स्वॅग' म्हणून ओळखले जातात. पण आता या व्हिडीओंवर बंदी घालण्यात आली आहे.

वर्दीतले व्हिडीओ पोस्ट करण्यास बंदी, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय; अन्यथा...
Mumbai PoliceImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 22, 2026 | 10:26 AM
Share

मुंबई पोलिस दलाने एक महत्त्वाचा आणि कडक निर्णय घेतला आहे. शहरातील सुमारे 51 हजार पोलिस कर्मचाऱ्यांना वर्दीत (युनिफॉर्ममध्ये) असताना रील्स, मिनी-व्लॉग्स किंवा इतर कोणत्याही प्रकारचे सोशल मीडिया व्हिडीओ तयार करून पोस्ट करण्यास तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी घेतलेला हा मोठा निर्णय आहे.

सोशल मीडियावर पोलिसांच्या वर्दीतल्या व्हिडीओंचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ‘खाकी स्वॅग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्हिडीओंमध्ये पोलिस कर्मचारी डान्स, फिटनेस, ड्यूटी दरम्यानचे क्षण किंवा मजेशीर कंटेंट शेअर करतात. मात्र, यामुळे गोपनीयता आणि ऑपरेशनल सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त झाल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

परिपत्रकात नेमकं काय?

विशेष शाखेचे डीसीपी दत्तात्रय कांबळे यांनी जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट म्हटले आहे की, अशा व्हिडीओंमध्ये अनेकदा अनावधानाने कार्यालय परिसर, शासकीय वाहने, उपकरणे किंवा ड्यूटीशी संबंधित माहिती दिसून येते. यामुळे गोपनीय माहिती उघड होण्याचा आणि सुरक्षेचा धोका वाढण्याचा संभाव्य धोका आहे. परिपत्रकात पुढे असे नमूद केले आहे की, “मुंबई पोलिस दलातील काही अधिकारी/कर्मचारी वर्दीत असताना सोशल मीडियावर रील्स, मिनी-व्लॉग्स किंवा इतर व्हिडीओ तयार करून पोस्ट करत असल्याचे लक्षात आले आहे. यापुढे असे कोणतेही व्हिडीओ अपलोड करू नयेत, असे कठोर निर्देश देण्यात आले आहेत.”

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर…

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, मुंबई पोलिसांची सोशल मीडिया लॅब आता ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सक्रियपणे नजर ठेवणार आहे आणि कोणत्याही उल्लंघनाची तक्रार नोंदवून संबंधित कारवाई करणार आहे. हा निर्णय २० फेब्रुवारी २०२६ रोजी जारी करण्यात आला असून, तो तात्काळ लागू झाला आहे.

मुंबई पोलिस दलाने यापूर्वीही सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती, पण आता वर्दीतील व्हिडीओंवर स्पष्ट बंदी घालण्यात आल्याने हे पाऊल अधिक कठोर मानले जात आहे. पोलिस दलाच्या या निर्णयामुळे ‘खाकी स्वॅग’चा ट्रेंड आता थांबणार असून, कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवरून वर्दीशिवायच कंटेंट तयार करण्याची मुभा राहील. मात्र, गोपनीयता आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर आता अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा