AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरातून लाखोंची चोरी, चोरांनी २५ फूट भिंतीवरून चढून केला घरात प्रवेश

बेडरूममधील फर्निचर, कपाट या सर्वांचे दरवाजे उघडून चोरी केली आहे. चोरटे शिल्पा शेट्टीच्या बेडरूममध्ये खिडकीतून घुसले होते.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरातून लाखोंची चोरी, चोरांनी २५ फूट भिंतीवरून चढून केला घरात प्रवेश
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jun 15, 2023 | 7:42 PM
Share

गोविंद ठाकूर, प्रतिनिधी, मुंबई : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी मुंबईतील जुहूमधील सर्वात पॉश भागात राहते. समुद्रकिनारी वसलेल्या शिल्पा शेट्टीच्या घरात बाहेरचा माणूस सरहा जाऊ शकत नाही. तिच्या घराभोवती 24 तास सुरक्षा तैनात असते. त्यानंतरही दोन चोरट्यांनी समुद्रातून 25 फूट बाउंड्री वॉल चढून शिल्पा शेट्टीच्या घरी गेले. शिवाय तेथून लाखोंचा ऐवज चोरून पळ काढला. जुहू पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून रोजी शिल्पा शेट्टीच्या घरात चोरीची घटना उघडकीस आली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जुहू पोलिसांनी शिल्पा शेट्टीच्या घरात चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक केली आहे.

अटकेतील आरोपींची नावे

अजय चित्ता (वय 22 वर्ष) या आरोपीवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे 4 गुन्हे दाखल आहेत. अर्जुन देवेंद्र (वय 26 वर्षे) या आरोपीविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात 16 चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या दोघांनाही पोलिसांनी नेहरु नगर विलेपार्ले पश्चिम, मुंबई येथून अटक केली आहे. शिल्पा शेट्टीच्या घरातून चोरी केल्यानंतर दोघेही मुंबईबाहेर जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र ते पळून जाण्यापूर्वीच जुहू पोलिसांनी दोघांना अटक केली.

शिल्पा शेट्टी लंडनमध्ये

या अजय आणि अर्जून यांनी शिल्पा शेट्टीच्या घरातून काय चोरी केली आणि किती चोरी केली, हे अद्याप समजू शकलेले नाही. शिल्पा शेट्टी सध्या लंडनमध्ये आहे. ती मुंबईत आल्यावरच कळेल, असे जुहू पोलिसांनी सांगितले.

शिल्पा शेट्टीच्या घरातील या मोठ्या चोरीच्या घटनेची उकल करणारे जुहू पोलिसांचे डिटेक्शन ऑफिसर आणि एपीआय विजय धोत्रे यांनी सांगितले की, आरोपींना आजच अटक करण्यात आली. त्यांची चौकशी सुरू आहे.

खिडकीतून बेडरूममध्ये शिरले चोरटे

विजय धोत्रे यांनी सांगितले की, शिल्पा शेट्टीच्या घरात रात्री 3.25 च्या सुमारास या चोरट्यांनी तोंडाला गमछा बांधून प्रवेश केला. त्यांचा मास्टर बेडरूम हॉल, डायनिंग टेबल, वॉर्डरोब, बेडरूममधील फर्निचर, कपाट या सर्वांचे दरवाजे उघडून चोरी केली आहे. चोरटे शिल्पा शेट्टीच्या बेडरूममध्ये खिडकीतून घुसले होते.

जुहू पोलीसचे डिटेक्शन ऑफिसर एपीआय विजय धोत्रे, अमित महांगडे, नितीन मांडेकर, सुहास भोसले, प्रकाश तासगावकर, पोलीस शिपाई बनकर यांनी ही कारवाई केली. दोन्ही चोरट्यांना अटक केली.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार