AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तळोजा कारागृहाबाहेर अर्णव समर्थक आणि महाराष्ट्र पोलीस समर्थकांचा ‘सामना’, जोरदार घोषणाबाजी

ळोजा कारागृहाच्या परिसरात अर्णव समर्थक आणि मुंबई पोलिसांच्या समर्थकांमध्ये सामना रंगलेले पाहायला मिळाला. | Arnab goswami

तळोजा कारागृहाबाहेर अर्णव समर्थक आणि महाराष्ट्र पोलीस समर्थकांचा 'सामना', जोरदार घोषणाबाजी
| Updated on: Nov 08, 2020 | 12:54 PM
Share

नवी मुंबई: रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab goswami) यांना झालेल्या अटकेवरून आता सामान्य लोकांमध्येही दोन तट पाहायला मिळत आहेत. अर्णव गोस्वामी यांनी रविवारी सकाळी अलिबागहून खारघरच्या तळोजा कारागृहात आणण्यात आले. त्यावेळी तळोजा कारागृहाच्या परिसरात अर्णव समर्थक आणि मुंबई पोलिसांच्या समर्थकांमध्ये सामना रंगलेले पाहायला मिळाला. (Arnab goswami supporters clash with Mumbai police supporters at Taloja Jail)

या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. मात्र, हे प्रकरण मारामारीपर्यंत जाण्यापूर्वीच पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या समर्थकांना पांगवले. तरीही दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी सुरुच राहिली. ‘अर्णव गोस्वामी खोटारडा आहे, महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद’, असे नारे मुंबई पोलिसांच्या समर्थनार्थ जमलेल्या गटाने दिले.

तत्पूर्वी पोलिसांनी रविवारी सकाळी अर्णव गोस्वामी यांना अलिबागहून नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात हलवण्याचा निर्णय घेतला. अलिबागवरून तळोजाच्या दिशेने रवाना होत असताना अर्णव गोस्वामी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. माझा जीव धोक्यात आहे. मला माझ्या वकिलांशी बोलून दिले जात नाही. मला आज सकाळी सहा वाजता उठवण्यात आले. पोलिसांनी मला धक्काबुक्की केली. त्यामुळे माझ्या जीवाला धोका असल्याचे अर्णव गोस्वामी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

अर्णव गोस्वामींच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करू; राम कदम यांची सिद्धिविनायकापर्यंत पदयात्रा

पत्रकार अर्णव गोस्वामी यांची सुटका व्हावी म्हणून उपोषण करणारे भाजपचे आमदार राम कदम आता अर्णव यांच्या सुटकेसाठी थेट सिद्धिविनायकाला साकडे घालणार आहेत. राम कदम हे घाटकोपर येथील त्यांच्या निवासस्थानापासून ते प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पदयात्रा करणार असून अर्णव यांच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार असल्याचं कदम यांनी सांगितले.

पोलिसांना गुंगारा देत अर्णव गोस्वामींपर्यंत पोहोचवण्यात आला मोबाईल फोन अलिबागच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पोलिसांना चकमा देत एका व्यक्तीने अर्णव गोस्वामी यांच्यापर्यंत मोबाईल पोहोचवल्याची माहिती समोर आली आहे. या मोबाईलवरुन अर्णव गोस्वामी यांनी एक फोन केल्याचेही समजते. सध्या पोलिसांकडून या सगळ्याची अंतर्गत चौकशी सुरु आहे. मात्र, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी अर्णव गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आल्याचे सांगितले जाते. संबंधित बातम्या:

Arnab Goswami| हरिश साळवे म्हणाले, अर्णवला जामीन दिल्यास आभाळ कोसळेल का? कोर्टात काय काय घडलं?

‘वृत्तपत्र स्वातंत्र्याचे गटार राजकारण्यांनीच केले!’ अर्णव गोस्वामींच्या अटकेनंतर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरुन होणाऱ्या टीकेला राऊतांचं ‘रोखठोक’ उत्तर

अर्णव गोस्वामींसोबत अटकेत असलेले फिरोज शेख तीन दिवसांपासून एकाच कपड्यांवर?, मानवी हक्काचे उल्लंघन; वकिलाचा आरोप

(Arnab goswami supporters clash with Mumbai police supporters at Taloja Jail)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.