AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“नामांतरावरून आंदोलन करणारे हे टिनपाट”; मनसे नेत्याची एमआयएमवर सडकून टीका

जे कोणी छत्रपती संभाजीनगर नावावरून कोण बाळासाहेब ठाकरे अस प्रश्न विचारत आहेत. त्यांनी त्यांच्या बापाला विचारावे बाळासाहेब ठाकरे कोण आहेत ते सांगतील अशा शब्दात त्यांनी त्यांचाय समाचार घेतला आहे.

नामांतरावरून आंदोलन करणारे हे टिनपाट; मनसे नेत्याची एमआयएमवर सडकून टीका
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Mar 10, 2023 | 1:17 AM
Share

मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मनसेचे नेते बाळ नांदगावकर यांनी मनसेचा राजकीय प्रवास सांगतानाच त्यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून एमआयएम पक्षासह खासदार इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. औरंगाबाद शहराचे नामाकरण झाल्यानंतर त्याला एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर या नावाला विरोध दर्शवत त्या ठिकाणी आंदोलन केले आहे. त्यावरून त्यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर या नावाला विरोध दर्शवल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

यावेळी बाळा नांदगावकर यांनी त्यांच्यावर टीका करताना इम्तियाज जलील टिनपाट म्हणून त्यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. तर त्याच बरोबर एमआयएम पक्षाचे प्रमुखांवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

काल परवा संभाजीनगरमध्ये टिनपाट म्हणत इम्तियाज जलील यांच्यावर टीका करत हे टिनपाट आता छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करत आहेत.

मात्र त्यांना हे सांगायला पाहिजे की, तुमच्या त्या औरंगजेबाला या काळ्या आणि तांबड्या मातीत गाडलं आहे अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

जे कोणी छत्रपती संभाजीनगर नावावरून कोण बाळासाहेब ठाकरे अस प्रश्न विचारत आहेत. त्यांनी त्यांच्या बापाला विचारावे बाळासाहेब ठाकरे कोण आहेत ते सांगतील अशा शब्दात त्यांनी त्यांचाय समाचार घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगर असं नामाकरण केल्यानंतर काही जण कोण बाळासाहेब असा सवाल उपस्थित करत आहेत. मात्र आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेणारे मात्र मतांच्या लाचारीसाठी ब्रही ते उच्चारत नाहीत अशा शब्दात त्यांनी ठाकरे गटाचा समाचार घेतला आहे.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन