छत्रपती आमचेही आदर्श आहेत, राजमुद्रेला विरोध करणाऱ्यांना मनसेचं उत्तर

छत्रपतींचं राज्य हे लोककल्याणकारी राज्य होतं. तशाप्रकारचं लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा निर्धार राज ठाकरेंनी घेतला आहे", असा दावा मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर  यांनी केला.

छत्रपती आमचेही आदर्श आहेत, राजमुद्रेला विरोध करणाऱ्यांना मनसेचं उत्तर
Follow us
| Updated on: Jan 23, 2020 | 10:47 AM

मुंबई : “काही लोकांनी राजमुद्रेवरुन विरोध केला असेल पण माझी त्यांना विनंती आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांना जसे तुम्ही आदर्श मानतात तसं आम्हीदेखील आदर्श मानतो. छत्रपतींचं राज्य हे लोककल्याणकारी राज्य होतं. तशाप्रकारचं लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठीच राज ठाकरेंनी तो निर्णय घेतला आहे”, असा दावा मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar On MNS new flag)  यांनी केला.

मनसेच्या महाअधिवेशनात सर्वात अगोदर झेंड्याचं अनावरण करण्यात आलं. याबाबत नांदगाकर यांना प्रश्न विचारला असता, “आता भगवा आसमंतात दुमदुमणार आहे. सर्वांपर्यंत भगवा पोहोचावा म्हणून सगळ्यातआधी झेंड्याचं अनावरण करण्यात आलं, अशी माहिती त्यांनी दिली (Bala Nandgaonkar On MNS new flag) .

“‘विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा’ ही आता आमची टॅगलाईन आहे. भगवा झेंडा घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. झेंड्यावर राजमुद्रा आहे. त्याला अनुसरुनच राज ठाकरे आज मुद्दे मांडतील”, असे बाळा नांदगावकर म्हणाले.

महाराष्ट्रातील विद्यार्थी, महिला, शेतकरी अशा सगळ्यांच्या दृष्टीने जे महत्त्वाचे ठराव आहेत ते या अधिवेशनात मांडले जाणार आहेत, असेदेखील बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईत पार पडत आहे. या अधिवशेनात राज ठाकरे मनसेच्या पुढील वाटचालीबाबत महत्त्वाची घोषणा करणार आहेत. मनसेने आता हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेतला आहे. मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे. हा झेंडा भगवा आहे आणि त्याच्यावर शिवरायांची राजमुद्रा आहे. याच राजमुद्रेला मराठा क्रांती मोर्चा आणि इतर संघटनांकडून विरोध केला जात आहे.

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.