AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाईंदरचे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय ‘कोव्हीड19 हॉस्पिटल’ घोषित

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात कोरोना उपचारासाठी 100 बेड सज्ज करण्यात आले आहेत. सहा व्हेंटीलेटर यंत्रे आणि अतिदक्षता कक्षही तयार करण्यात आले आहेत. (Bhainder Hospital for Corona Patients)

भाईंदरचे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय 'कोव्हीड19 हॉस्पिटल' घोषित
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 01, 2020 | 4:41 PM
Share

मिरा भाईंदर : भाईंदर पश्चिम भागातील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय आता कोव्हीड19 रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. या रुग्णालयात आता केवळ कोरोनाग्रस्त रुग्णांवरच उपचार करण्यात येणार आहेत. एक एप्रिलपासून याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. रुग्णालयात अन्य आजारांसाठी येणार्‍या रुग्णांना आता इतर रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. (Bhainder Hospital for Corona Patients)

मिरा भाईंदर शहरात ‘कोरोना’ची लक्षणे आढळलेल्या रुग्णांना आतापर्यंत मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात येत होते. मात्र आता रुग्णालयात ‘कोरोना’च्या संशयित रुग्णांचे नमुने घेणे, ‘कोरोना’ग्रस्तांवर उपचार करणे, त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवणे हे सोपस्कार टेंभा येथील रुग्णालयतच पार पडणार आहेत.

रुग्णालयात कोरोना उपचारासाठी 100 बेड सज्ज करण्यात आले आहेत. रुग्णालयात सहा व्हेंटीलेटर यंत्रे आणि अतिदक्षता कक्ष तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी आता केवळ कोरोनाबाधितांवरच उपचार केले जाणार आहेत. इतर रुग्णांना महापालिकेच्या मिरा रोड येथील रुग्णालयात तसेच इतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात येणार आहेत. गर्भवती महिलांच्या प्रसुतीचा खासगी रुग्णालयात होणारा खर्चही महापालिकेकडून दिला जाणार आहे.

हेही वाचा : निजामुद्दीनमधील ‘तब्लिग जमात’ ‘कोरोना’चा हॉटस्पॉट कसा ठरला?

महापालिकेच्या आरोग्य विभागाने आज शहरातील डॉक्टर संघटनांशी बैठका घेऊन त्यांच्याकडून संपूर्ण सहकार्याची मागणी केली. वरिष्ठ डॉक्टरांनी शहराला डॉक्टरांची आवश्यकता असून या कोरोनाशी दोन हात करण्यासाठी डॉक्टर पूर्णपणे सहकार्य करतील असे आश्वासन यावेळी दिले. महापालिकेच्या 10 प्राथमिक आरोग्य केंद्रात महापालिकेच्या डॉक्टरांसोबतच एक खासगी डॉक्टर देखील तैनात केला जाणार आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत मिरा रोड येथील नया नगर भागात एकाच घरातील तीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याचप्रकारे याच घरातील दोन रुग्णांचा अहवाल अद्यापही आला नसून त्यांना देखील लागण झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Bhainder Hospital for Corona Patients)

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...