AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय कुलकर्णीच्या दुकानात 170 शस्त्रं, प्लॅन काय होता?

ठाणे: भाजपचा डोंबिवलीतील पदाधिकाऱ्याच्या दुकानात मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. भाजपचा  डोंबिवली जिल्हाउपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीच्या फॅशनेबल वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानात तब्बल 170 धारदार शस्त्र सापडली. याप्रकरणी क्राईम ब्रांचने धनंजय कुलकर्णीला बेड्या ठोकल्या आहेत. एवढा मोठा शास्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी धनंजय कुलकर्णीला कल्याण कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठविले होते. मात्र पोलिसांनी त्याची […]

धनंजय कुलकर्णीच्या दुकानात 170 शस्त्रं, प्लॅन काय होता?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM
Share

ठाणे: भाजपचा डोंबिवलीतील पदाधिकाऱ्याच्या दुकानात मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. भाजपचा  डोंबिवली जिल्हाउपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीच्या फॅशनेबल वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानात तब्बल 170 धारदार शस्त्र सापडली. याप्रकरणी क्राईम ब्रांचने धनंजय कुलकर्णीला बेड्या ठोकल्या आहेत. एवढा मोठा शास्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी धनंजय कुलकर्णीला कल्याण कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठविले होते. मात्र पोलिसांनी त्याची आज पोलीस कोठडी मागितली. मुंबईहून ही हत्यारं आणून त्याची विक्री करत असल्याची कबुली धनंजय कुलकर्णीने दिली.

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोड परिसरात तपस्या हाऊस ऑफ फॅशन या फॅशनेबल वस्तूच्या दुकानात मोठा शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री साडेआठच्या सुमारास धाड टाकून छापेमारी केली.

या छापेमारीत 62 स्टील आणि पितळी धातूचे फायटर्स, 38 बटनचाकू, 25 चॉपर्स, 10 तलवारी, 9 कुकऱ्या, 9 गुप्त्या, 5 सुरे, 3 कुऱ्हाडी, 1 कोयता आणि 9 एयरगनसह मोबाइल आणि काही रोख रक्कम असा सुमारे 1 लाख 86 हजार रुपये किंमतीचा शस्त्रसाठा हस्तगत केला.

आरोपी दुकानदार धनंजय हा डोंबिवलीतील टिळकनगर परिसरातील न्यू दिपज्योत सोसायटीत राहतो.  त्याचे मानपाडा रोडला महावीर नगरातील अरिहंत बिल्डिंगच्या तळमजल्यावर तपस्या हाऊस ऑफ फॅशन नावाचे दुकान आहे. याच दुकानात हा शस्त्रसाठा सापडला. मुंबईहून ही हत्यारं आणून त्याची विक्री करत असल्याची कबुली धनंजय कुलकर्णीने दिली. धनंजयकडून कुणी कुणी हत्यारांची खरेदी केली आणि त्या हत्यारांचा गुन्ह्यामध्ये वापर झाला का याचा तपास आता पोलिसांना करायचा आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...