AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: उदयनराजे भोसले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

गेल्या काही दिवसांत उदयनराजे भोसले हे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. | Udayanraje Bhosale

मोठी बातमी: उदयनराजे भोसले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Feb 17, 2021 | 1:32 PM
Share

मुंबई: भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhonsale) यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. काहीवेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी उदयनराजे दाखल झाले आहेत.  (BJP MP Udayanraje Bhosale meets CM Uddhav Thackeray at Varsha bunglow)

मात्र, गेल्या काही दिवसांत उदयनराजे भोसले हे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला होता. तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही उदयनराजे यांनी व्यक्त केली होती.

या भेटीत उदयनराजे भोसले आणि उद्धव ठाकरे यांच्यात मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाली. यावेळी उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसमोर काही प्रश्न उपस्थित केले.

उदयनराजे भोसले यांचे मुख्यमंत्र्यांना पाच प्रश्न

*जर एसईबीसी उमेदवाराने ईडब्यूएस कोट्यातून आरक्षण स्वीकारलं तर सर्वोच्च न्यायालयातील केसवर काही परिणाम होणार आहे का? *जर मोठ्या प्रमाणावर ईडब्यूएस आरक्षण स्वीकारलं तर त्याचा या केसवर काही परिणाम होणार आहे का ? *ईडब्यूएस आरक्षण रद्दबातल ठरवल तर त्याचा मराठा समाजातील उमेदवारांवर काही परिणाम होईल का ? *महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ कमिटीने सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यासंबधी जे काही निर्णय घेतले आहेत. ते समाजासमोर आले पाहिजेत. जेणेकरुन खटल्यात सरकारकडून वकिलांना नेमके काय निर्देश दिले गेले आहेत याचा खुलासा होईल. *MPSC च्या माध्यमातून निवड झालेल्या 2150 उमेदवारांसाठी सुपर न्युमररी पोस्ट निर्माण करून त्यांना नोकरीत सामावून का घेत नाही?

‘वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालेन’

राठा आरक्षणाला प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पडल्यास मी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, असे वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी मध्यंतरी केले होते. राज्यातील वडीलधाऱ्या माणसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. उदयनराजे यांच्या या वक्तव्याचा रोख शरद पवार यांच्या दिशेने होता. गेल्याच आठवड्यात उदयनराजेंनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली होती.

शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे अन्यथा उद्रेक होईल; उदयनराजे भोसलेंचा इशारा

महाविकासआघाडीच सरकारचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घातले पाहिजे. अन्यथा राज्यात मोठा उद्रेक होईल. यापूर्वी मराठा समाजाने आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढले होते. मात्र, आता काय होईल हे सांगता येत नाही, असा गंभीर इशारा भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला होता.

सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या खटल्यात राज्य सरकारचे वकील व्यवस्थितपणे बाजू मांडताना दिसत नाहीत. त्यामुळे आता शरद पवार यांनी या सगळ्यात वैयक्तिकरित्या लक्ष घालून राज्य सरकारला सूचना दिल्या पाहिजेत. महाविकासआघाडी ही शरद पवार यांच्यामुळेच सत्तेत आहे. या सगळ्याची बांधणी त्यांनीच केली. त्यामुळे राज्य सरकारला सांगून मराठा आरक्षणावर तोडगा काढणे, हेदेखील शरद पवार यांचेच काम आहे, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या :

बंदूक तुमच्या हातात होती, त्यावेळेस तुम्ही काय करत होता; उदयनराजे भोसलेंचा सवाल

सोनिया गांधींच्या घराबाहेर नाना पटोले दिसताच उदयनराजेंनी गाडी थांबवली अन्….

(BJP MP Udayanraje Bhosale meets CM Uddhav Thackeray at Varsha bunglow)

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...