AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत कचऱ्याचे ढिग, सफाई कर्मचाऱ्यांचं आंदोलन

मुंबई: सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केल्यामुळे मुंबईत कचऱ्याचे ढिग पाहायला मिळत आहेत. कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या पालिकेचे कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगारांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. महापालिकेने कचरा गोळा करुन डम्पिंग ग्राऊंडपर्यंत पोहोचवण्याचे काम पूर्णपणे कंत्राटदाराकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. त्याचा परिणाम म्हणून मुंबईच्या […]

मुंबईत कचऱ्याचे ढिग, सफाई कर्मचाऱ्यांचं आंदोलन
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM
Share

मुंबई: सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केल्यामुळे मुंबईत कचऱ्याचे ढिग पाहायला मिळत आहेत. कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या पालिकेचे कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगारांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. महापालिकेने कचरा गोळा करुन डम्पिंग ग्राऊंडपर्यंत पोहोचवण्याचे काम पूर्णपणे कंत्राटदाराकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. त्याचा परिणाम म्हणून मुंबईच्या सर्व 24 वॉर्डमध्ये कचराकोंडी झाली आहे. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे या आंदोलनावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

महापालिकेने बुधवारपासून सफाईचं काम कंत्राटदाराकडे सोपवलं आहे. मात्र अनेक वर्षांपासून महापालिकेकडे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे. कंत्राटदार आपले कर्मचारी त्याठिकाणी लावू शकतो, असा या कर्मचाऱ्यांचा अंदाज आहे. शिवाय कायमस्वरुपी सफाई कामगारांना अन्य विभागांमध्ये सामावून घेतले जाणार आहे. या सर्व निर्णयाला सफाई कर्मचाऱ्यांचा विरोध आहे.

त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी आजपासून मुंबईत कुठेही कचरा उचलणार नाही असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत आज कचऱ्याचे ढिग आणि दुर्गंधी पसरली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...