LIVE : विधानभवनात मराठी भाषा दिनाचा गौरव

LIVE : विधानभवनात मराठी भाषा दिनाचा गौरव

[svt-event title=”भले मुलांना इंग्रजी शाळेत टाका, परंतु मुलांनी घरात मराठीच बोललं पाहिजे – अजित पवार” date=”27/02/2020,11:44AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”विधानभवनात मराठी भाषा दिनाचा गौरव” date=”27/02/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अश्लील उद्योग चित्रपटाच्या नावाला ब्राम्हण महासंघाचा विरोध” date=”27/02/2020,10:41AM” class=”svt-cd-green” ] अश्लील उद्योग चित्रपटाच्या नावाला ब्राम्हण महासंघाने विरोध केला आहे. चित्रपटामुळे तरुणांमध्ये विकृती वाढीस लागणार असल्याचा आरोपही या ब्राम्हण महासंघाकडून करण्यात येत आहे. अश्लील उद्योग चित्रपट म्हणजे सॉफ्ट पॉर्न असल्याची टीका महासंघाचे आनंद दवे यांनी केली. [/svt-event]

[svt-event title=”सायन उड्डाणपूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद ” date=”27/02/2020,9:23AM” class=”svt-cd-green” ] सायन उड्डाणपूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत हा पूल बंद राहणार आहे. याबाबतची माहिती माटुंगा वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”वाशिम येथे पोलीस शिपायाची आत्महत्या” date=”27/02/2020,9:19AM” class=”svt-cd-green” ] वाशिम येथे पोलीस शिपायाने आत्महत्या केली आहे. मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना वाशिम तालुक्यातील चिखली रोडवर घडली. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. [/svt-event]

[svt-event title=”नागपूर महापालिकेत 100 टक्के कर्मचाऱ्यांची हजेरी ” date=”27/02/2020,9:16AM” class=”svt-cd-green” ] मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंच्या दराऱ्याने नागपूर महापालिकेत कर्मचार्यांची हजेरी 100 टक्क्यांवर आली आहे. महिनाभरात महानगरपालिका कर्मचाऱ्यांची हजेरी 60 वरुन 100 टक्क्यांवर आली आहे. लेटलतीफ कर्मचारीही आता वेळेपूर्वी कार्यालयात येतात. [/svt-event]

[svt-event title=”माजी नगरसेवकाच्या घरावर अज्ञातांचा गोळीबार” date=”27/02/2020,9:11AM” class=”svt-cd-green” ] मालेगाव येथील माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या घरावर अज्ञाताने गोळीबार केला. गोळीबारात रिजावन खान थोडक्यात बचावले आहेत. ही घटना मालेगाव येथील महेश नगर येथे घडली. [/svt-event]

[svt-event title=”निफाडचा पारा घसरला, थंडीत वाढ” date=”27/02/2020,9:07AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमधील निफाड येथील पारा घसरला आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 7.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. [/svt-event]

[svt-event title=”दिल्ली हिंसाचारात 28 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू, 250 जखमी ” date=”27/02/2020,9:04AM” class=”svt-cd-green” ] दिल्ली हिंसाचारमध्ये 28 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू तर 250 पेक्षा जास्त लोक जखमी आहेत. दिल्ली पोलीस आणि पॅरा मिलिट्री फोर्स रात्रं-दिवस गस्त घालत आहे. सद्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. [/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI