AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mega Block : मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी, हार्बर लाईनवर मेगाब्लॉक, मध्य रेल्वेची माहिती

मुंबई लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे विभागाकडून आज हार्बर (Harbour) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

Mega Block : मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी, हार्बर लाईनवर मेगाब्लॉक, मध्य रेल्वेची माहिती
रविवारी मेगाब्लॉक
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Feb 20, 2022 | 6:41 AM
Share

मुंबई : मुंबई लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे विभागाकडून आज हार्बर (Harbour) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तर मध्य आणि पश्चिम या मेन लाईनवर मेगा ब्लॉक नाही, असं रेल्वे विभागाकडून कळवण्यात आलं आहे. मध्य रेल्वे रविवारी म्हणजेच आज हार्बर मार्गावरील उपनगरीय विभागात मेगा ब्लॉक कार्यान्वित करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर लाईन सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत बंद असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहील, असं मध्य रेल्वेकडून (Central Railway) कळवण्यात आलं आहे.

या देखील सेवा बंद राहणार

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र.8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील,असं मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आलं आहे.

मेन लाईनवरुन प्रवास करण्याची परवानगी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विभागातील मेन लाईनवर मेगाब्लॉक असणार नाही. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, मेगाब्लॉक मुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

इतर बातम्या:

Nagpur | वर्षातून तेरा दिवस वाजवा रे वाजवा!, पण, मर्यादेचे पालन करा, केव्हा वाजविता येणार दिवसभर ध्वनिक्षेपक?

Assembly Election 2022 Live Updates : पंजाबमध्ये सर्व जागांसाठी तर उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान

Maharashtra News Live Update : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मुंबईत येणार, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची भेट घेणार

Follow Us
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब