AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपालांना निरोप देऊन मुख्यमंत्री वळले, 103 वर्षीय स्वातंत्र्य सैनिकाला भेटून म्हणाले…

मुंबईतील शिवाजी पार्कात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshiyari) यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झालं.

राज्यपालांना निरोप देऊन मुख्यमंत्री वळले, 103 वर्षीय स्वातंत्र्य सैनिकाला भेटून म्हणाले...
उद्धव ठाकरे
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jan 26, 2021 | 11:56 AM
Share

मुंबई : देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा  (Shivaji Park flag hoisting Republic Day) उत्साह आहे. मुंबईतील शिवाजी पार्कात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshiyari) यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झालं. यानंतर भगत सिंह कोश्यारी यांनी राज्याला उद्देशून भाषण केले. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सायबर पोलीस ठाणे उद्घाटन सोहळा झाला. (Chief Minister Uddhav Thackeray meets senior freedom fighters at Shivaji Park after flag hoisting Republic Day)

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पाच विभागीय सायबर पोलीस ठाण्यांचे ॲानलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. याचबरोबर 94 पोलीस ठाण्यातील स्वागत कक्षांचे उद्घाटनदेखील केले.

या उद्घाटन सोहळ्याला गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगल प्रभात लोढा, अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,पोलीस आयुक्त परम बीर सिंग आदी मान्यवर यावेळी उपस्थित.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकासाठी मुख्यमंत्री थांबले

शिवाजी पार्क येथे राष्ट्रध्वजवंदन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित 103 वर्षांचे स्वातंत्र्य सैनिक सत्यबोध सिंगीत यांना पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या जवळ गेले आणि त्यांनी विचारपूस केली. सत्यबोध यांच्यासमवेत त्यांचा मुलगा आणि सूनदेखील होते.

खुद्द मुख्यमंत्री आस्थेने चौकशी करताहेत म्हटल्यावर सत्यबोध सिंगीत यांनी आनंद व्यक्त करुन त्यांनी आशीर्वाद दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या.

मुख्य कार्यक्रम संपल्यावर राज्यपाल आणि इतर मान्यवर परत जाण्यासाठी प्रवेशद्वारावर उभे होते. त्यांना निरोप देऊन मुख्यमंत्री अचानक आतमध्ये वळले आणि स्वातंत्र्य सैनिक कक्षाकडे गेले. तिथे उपस्थित वयोवृद्ध अभ्यागतांची अधिक विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री आत वळले.

VIDEO : शिवाजी पार्कातील ध्वजारोहण सोहळा

संबंधित बातम्या   

Mumbai | Azad Maidan Flag Hoisting | मुंबईतील आझाद मैदानावर शेतकरी महिलेच्या हस्ते ध्वजारोहण    

Mumbai | BMC Flag Hoisting | महापौर किशोरी पेडणेकरांच्या हस्ते मुंबई महापालिकेत ध्वजारोहण

(Chief Minister Uddhav Thackeray meets senior freedom fighters at Shivaji Park after flag hoisting Republic Day)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...