AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्दी टाळण्यासाठी दादरची दुकानं 100% लॉकडाऊन, व्यापारी संघटनेचा स्तुत्य निर्णय

दादर व्यापारी संघटनेने स्वत:हून पुढाकार घेत 100% दुकाने गुढीपाडव्यापर्यंत बंद ठेवणार असल्याचा निर्णय घेतला (Dadar Shops Closed to prevent Corona)

गर्दी टाळण्यासाठी दादरची दुकानं 100% लॉकडाऊन, व्यापारी संघटनेचा स्तुत्य निर्णय
Anish Bendre
Anish Bendre | Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Mar 19, 2020 | 12:44 PM
Share

मुंबई : ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव दुसऱ्या टप्प्यातच रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. सर्वसामान्य नागरिकांकडूनही सरकारला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गर्दी टाळण्यासाठी दादरच्या बाजारपेठांमधील 100 टक्के दुकानं बंद ठेवण्याचा स्तुत्य निर्णय दादर व्यापारी संघटनेने घेतला आहे. (Dadar Shops Closed to prevent Corona)

गुढीपाडव्यापर्यंत दादरमधील सर्व दुकानं पूर्णत: बंद राहणार आहेत. प्रशासनाने एक दिवसाआड दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले होते, मात्र व्यापारी संघटनेने स्वत:हून पुढाकार घेत 100% दुकाने गुढीपाडव्यापर्यंत बंद ठेवणार असल्याचा निर्णय घेतला. ‘जी उत्तर’ वॉर्ड ऑफिसमध्ये पत्र देऊन व्यापारी संघटनेने आपला निर्णय कळवला.

याआधी, दादर, माहिममधील दुकानं बंद करण्यासाठी महापालिकेची पथकं रस्त्यावर उतरली होती. दुकानदारांनी आदेश पाळले नाहीत तर कारवाई करु, असं अधिकाऱ्यांनी सांगितले. दादरमधील सुविधा सेंटर, आयडियलच्या गल्लीतली दुकानं सकाळी सुरु होती. त्यामुळे पालिका अधिकारी रस्त्यावर उतरुन बंद करण्याचे आवाहन करत होते. एक दिवस आड दुकानं सुरु करण्यास सांगितले जात होतं.

मुंबईचे महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी विभागीय आयुक्तांना आपापल्या वॉर्डामधल्या बाजारपेठांची यादी आणि त्या कधी बंद ठेवता येतील, याचं नियोजन करण्याचे निर्देश दिले होते. रस्त्यांनुसार त्यावरील दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका मुख्यालय आणि पालिकेच्या इतर कार्यालयांमध्येही अंशत: प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. महापालिका मुख्यालय, वॉर्ड ऑफिस, खाते कार्यालय या ठिकाणी देण्यात येणारी प्रवेशपत्रे पुढील सूचना येईपर्यंत बंद करण्यात आली आहेत.

निम्म्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ न दिल्यास कंपनीवर कारवाई

महापौर, उपमहापौर, आयुक्त यांना बाहेरुन येणाऱ्या केवळ 10 व्यक्ती भेटू शकणार, तर अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त, समिती अध्यक्ष, उपायुक्त, खातेप्रमुख यांना बाहेरील केवळ 5 व्यक्तीच भेटू शकणार. इन्फ्रारेड थर्मामिटरच्या माध्यमातून शारीरिक तापमान तपासल्यानंतरच आत प्रवेश देण्यात येईल.

Dadar Shops Closed to prevent Corona

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...