AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“उद्धव ठाकरे नामर्द”; अनिल परब यांच्या कार्यालयाच्या कारवाईवरून टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली…

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली असल्याचे दिसून आले. नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे नामर्द असल्याची टीका करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे नामर्द; अनिल परब यांच्या कार्यालयाच्या कारवाईवरून टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Feb 01, 2023 | 1:01 AM
Share

मुंबईः बाद्र्यांतील आमदार अनिल परब यांच्या कार्यालयावर म्हाडाकडून कारवाई झाल्यानंतर शिंदे-भाजप विरोधी शिवसेना असा सामना रंगला आहे. आमदार अनिल परब यांच्या कार्यालयावर कारवाई सुरू झाल्यापासून दोन्ही गट आमने सामने आले आहेत. तर अनिल परब यांच्या कार्यालयावरील कारवाईवरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बेताल वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली असल्याचे दिसून आले. नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे नामर्द असल्याची टीका करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी अनिल परब यांच्या बांद्र्यातील कार्यालयावर झालेल्या कारवाईवरून ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला आहे. अनिल परब हा मातोश्रीच्या कारकून असल्याची हल्लाबोल त्यांनी केला आहे.

तर अनिल परब यांचे घर तर फक्त झाकी असून मातोश्री टू बाकी आहे असा इशाराही नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे.

तर आमदार अनिल परब यांनी सुक्या धमक्या देवू नये आमच्या घरात येवून धिंगाणा घालणे इतके सोपे नाही. ही काही मातोश्री नाही अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यावर टीका करताना त्यांनी वेळ आणि तारीख कळवावी आम्ही त्यांचे असे स्वागत करू की पुन्हा राणे साहेब यांच्या घरच्या इथे फिरणार नाहीत असा खणखणीत टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

तसेच राणे साहेबांच्या घरावर तक्रार करण्याअगोदर उद्धव ठाकरे नावाचा तुझा बाप आहे त्या बापाच्या घराच्या इथे बघ पुढे काय होते असा इशारा त्यांनी त्यांना दिला आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान