AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस सरकारची ‘दीन’दर्शिका, फुले-आंबेडकरांचा विसर

मुंबई : सभा-भाषणांमधून कायम फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावांचा जयघोष करणारे महत्त्वाच्या वेळी कशाप्रकारे या महापुरुषांना विसरतात, हे महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने नवीन वर्षाची दिनदर्शिकेच्या निमित्ताने समोर आले आहे. फडणवीस सरकारला महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा विसर पडल्याचे दिसून आले आहे. राज्य सरकारने 2019 या नववर्षाच्या दिनदर्शिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या […]

फडणवीस सरकारची 'दीन'दर्शिका, फुले-आंबेडकरांचा विसर
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM
Share

मुंबई : सभा-भाषणांमधून कायम फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावांचा जयघोष करणारे महत्त्वाच्या वेळी कशाप्रकारे या महापुरुषांना विसरतात, हे महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने नवीन वर्षाची दिनदर्शिकेच्या निमित्ताने समोर आले आहे. फडणवीस सरकारला महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा विसर पडल्याचे दिसून आले आहे. राज्य सरकारने 2019 या नववर्षाच्या दिनदर्शिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर रोजी असलेल्या महापरिनिर्वाणदिनाचा आणि महात्मा फुले यांच्या 28 नोव्हेंबर असलेल्या पुण्यतिथीचा उल्लेख नाही.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने नवीन वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. या दिनदर्शिकेचे वितरण मंत्रालयासह सरकारच्या सर्व कार्यालयांमध्ये करण्यात आले आहे. ज्या महापुरुषांच्या कार्याने पुरोगामी महाराष्ट्राची ओळख सांगितली जाते, त्यांच्या पुण्यतिथीच्या तारखेचाच फडणवीस सरकारला विसर पडल्याचं ही दिनदर्शिका पाहिल्यावर लक्षात येते. तर दुसरीकडे हा पद्धतीचं कॅलेंडर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हापासून काढलं जातंय. पण तेव्हाही या तारखा त्यात नव्हत्या, असं स्पष्टीकरण भाजपने दिलंय.

6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असतो. या दिवशी मुंबईतील दादरच्या चैत्यभूमीवर मोठ्या संख्येत जनसागर उसळतो. आंबेडकरांचे विचार मानणाऱ्यांमध्ये या दिवसाचं मोठं महत्त्व आहे. तरीही फडणवीस सरकारने मात्र सरकारी कॅलेंडरमध्ये या दिवसाला स्थान दिले नाही. कुठलाही उल्लेख 6 डिसेंबर या तारखेच्या रकान्यात केला नाही. तसेच, सरकारला महात्मा फुलेंचाही विसर पडला आहे. फुलेंच्या पुण्यतिथीचाही उल्लेख २८ नोव्हेंबर या तारखेच्या रकान्यात नाही.

सरकारच्या या दिनदर्शिकेत इतर सर्व जयंत्या आणि पुण्यातिथ्या देण्यात आल्या आहेत. मात्र, डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले यांचाच विसर सरकारला पडल्याने आता टीका सुरु झाली आहे. पण 2012 पासूनच म्हणजे आघाडी सरकारच्या काळापासूनच या पद्धतीने कॅलेंडर बनवलं जात असल्याचं भाजपने म्हटलंय. यासोबत 2012 सालच्या कॅलेंडरचा फोटोही भाजपने शेअर केलाय. शिवाय हा प्रकार जाणिवपूर्वक जनतेची दिशाभूल करण्यासाठी केलाय का? असा सवालही भाजपने केलाय.

Follow Us
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा