आदित्य ठाकरेंना भेटलेला पुण्यातील अफगाण विद्यार्थी अडचणीत, तालिबानकडून कुटुंबियांचा शोध सुरु

| Updated on: Aug 19, 2021 | 8:48 AM

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता काबिज केल्यानंतर परिस्थिती चिंताजनक होत चाललीय. अनेक अफगाण नागरिकांना देश सोडून जीव वाचवत पळावं लागत आहे. अशातच भारतात शिक्षणासाठी आलेल्या एका अफगाण वि्दयार्थ्याचं कुटुंब अफगाणिस्तानमध्ये धोक्यात आहे.

आदित्य ठाकरेंना भेटलेला पुण्यातील अफगाण विद्यार्थी अडचणीत, तालिबानकडून कुटुंबियांचा शोध सुरु
Follow us on

मुंबई : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता काबिज केल्यानंतर परिस्थिती चिंताजनक होत चाललीय. अनेक अफगाण नागरिकांना देश सोडून जीव वाचवत पळावं लागत आहे. अशातच भारतात शिक्षणासाठी आलेल्या एका अफगाण वि्दयार्थ्याचं कुटुंब अफगाणिस्तानमध्ये धोक्यात आहे. या विद्यार्थ्यानं राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत तालिबानवर टीका केली होती. यानंतर तालिबान्यांनी त्याच्या कुटुंबियांचा शोध सुरू केलाय. मोहम्मद अहमदादी असं या अफगाण विद्यार्थ्याचं नाव आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने शस्त्रांस्त्रांच्या बळावर सत्ता काबिज केल्यानंतर अनागोंदी माजलीय. तालिबानी खुलेआमपणे रस्त्यावर बंदुका घेऊन वावरत आहेत. सर्वसामान्य नागरिकांवर गोळीबार करत आहेत. विशेषतः तालिबानी सत्तेला आव्हान देणाऱ्या किंवा टीका करणाऱ्यांना तालिबानकडून लक्ष्य केलं जातंय. यानंतरही अफगाणमधील सामान्य महिला आणि नागरिक आंदोलन करत आपला विरोध दाखवत आहेत.

तालिबान्यांकडून कुटुंबाचा शोध घेतला जात असल्याचं लक्षात येताच मोहम्मद हा अफगाण विद्यार्थी चिंतेत आहे. आता तो पुन्हा आज (19 ऑगस्ट) आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहे.

उद्धवजी, माझ्या-आई वडिलांना वाचवा, पुण्यातील अफगाणी विद्यार्थ्याची आर्त हाक!

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तिकडे अफरातफरी माजली आहे. राष्ट्रपतींनी देश सोडल्यानंतर सामान्य नागरिकही दहशतीने देश सोडून जात आहेत. तिथले नागरिक विमानाच्या पंख्यावर बसून जीव वाचवण्यासाठी जीवघेणी धडपड करताना दिसत आहेत. त्यातच आपल्या नातेवाईकांच्या चिंतेने जगभरातील अफगाण नागरिक अस्वस्थ आहेत. इकडे पुण्यातही काही अफगाणिस्तानातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मोहम्मद अहमदी हा मूळचा अफगाणिस्तानचा विद्यार्थी सध्या पुण्यात राहतो. त्याचे आई-वडील अफगाणिस्तानातील काबूल शहरात अडकले आहेत. आपल्या आई-वडिलांच्या सुटकेसाठी त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनवणी केली आहे.

माझे आई-वडील अफगाणिस्तानच्या काबूल शहरात अडकले आहेत. तिकडची परिस्थिती खूप खराब आहे. दोन दिवसांपूर्वी माझं 5 मिनिटं आई वडिलांशी बोलणं झालं होतं,ते सध्या सुरक्षित आहेत. मी 17 ऑगस्टला दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असून, महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारने मला मदत करावी, अशी विनवणी मोहम्मद अहमदीने केली. तो टीव्ही 9 मराठीशी बोलत होता.

दोन्ही सरकारने प्रयत्न करावे

माझ्या आई वडिलांची सुटका व्हावी त्यासाठी दोन्ही सरकारने प्रयत्न करावेत. उद्धव ठाकरेंना विनंती आहे की व्हिसाची प्रक्रिया सोपी करावी, ज्यामुळे आम्हाला भारतात येता येईल, असं मोहम्मद अहमदी म्हणाला.

दहा वर्षापासून पुण्यात

मी 10 वर्षांपासून पुण्यात राहत आहे, शिक्षणासाठी मी पुण्यात आलो होतो. मी अफगाणिस्तानमध्ये गेलो तर माझ्या जीवाला धोका आहे, त्यामुळे मी तिकडे जात नाही, असंही मोहम्मद अहमदी म्हणाला.

हेही वाचा :

Afghanistan Crisis : अंगावरच्या कपड्यासह बाहेर पडलोय, चप्पल बदलायलाही वेळ नव्हता, पैशांचं तर सोडाच : अशरफ गनी

भारत-अफगाणिस्तान व्यापार ठप्प, आयात-निर्यातीसाठी बंदी; तालिबानचा फतवा

अफगानिस्तानमध्ये अजूनही 1600 भारतीय अडकलेले, मदतीसाठी भारताचा प्लॅन काय?

व्हिडीओ पाहा :

Family of Afghanistan student who meet Aditya Thackeray in risk due to Taliban