भारत-अफगाणिस्तान व्यापार ठप्प, आयात-निर्यातीसाठी बंदी; तालिबानचा फतवा

Taliban | अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानमार्गे मालाची ये-जा होत असे. मात्र, आता तालिबान्यांनी हाच मार्ग रोखून धरल्यामुळे अफगाणिस्तानमधील आयात-निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे.

भारत-अफगाणिस्तान व्यापार ठप्प, आयात-निर्यातीसाठी बंदी; तालिबानचा फतवा
भारत-अफगाणिस्तान
Follow us
| Updated on: Aug 19, 2021 | 6:40 AM

नवी दिल्ली: अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर पूर्वीचे निर्णय आणि धोरणे यामध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहे. एकीकडे भारत तालिबानसंदर्भात नेमकी काय भूमिका घ्यायची, या संभ्रमात आहे. परंतु, तालिबानने भारताविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार आता अफगाणिस्तानात भारताला व्यापारी आणि आयात-निर्यातीसाठी बंदी घालण्यात आली आहे.

भारतीय निर्यात संघटनेचे संचालक डॉ. अजय सहाय यांनी यासंदर्भातील माहिती दिली. तालिबानने व्यापारी मालाची वाहतूक बंद केली आहे. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानमार्गे मालाची ये-जा होत असे. मात्र, आता तालिबान्यांनी हाच मार्ग रोखून धरल्यामुळे अफगाणिस्तानमधील आयात-निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. भविष्यात तालिबानी प्रशासक काय निर्णय घेतात, याकडे आमचे लक्ष राहील, असे अजय सहाय यांनी सांगितले.

भारत-अफगाणिस्तानमधील व्यापारी संबंध

भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये अत्यंत चांगले व्यापारी संबंध आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने अफगाणिस्तानमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, आता तालिबानच्या सत्तेनंतर ही सर्व समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना याविषयी विचारले असता त्यांनीही इतक्यात याबाबत बोलणे घाईचे ठरेल, अशी प्रतिक्रिया दिली.

यंदाच्या वर्षात 835 मिलियन डॉलर्सची निर्यात

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 2021 मध्ये आतापर्यंत चांगला व्यापार झाला आहे. या कालावधीत भारताने अफगाणिस्तानात 835 कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. तर अफगाणिस्तानमधून 510 कोटी डॉलर्स मुल्याच्या वस्तू आयात करण्यात आल्या आहेत. याशिवाय, अफगाणिस्तानमध्ये भारताने तब्बल 400 प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीचा हा आकडा तब्बल 22 हजार कोटी रुपयांच्या घरात जातो.

85 टक्के सुकामेवा अफगाणिस्तानमधून

भारत अफगाणिस्तानमध्ये साखर, औषधे, चहा, कॉफी, मसाले आणि कापड अशा गोष्टींची निर्यात करतो. तर अफगाणिस्तानमधून भारतात आयात केल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये प्रामुख्याने सुकामेव्याचा समावेश आहे. भारतात होणाऱ्या सुकामेव्याच्या एकूण आयातीपैकी 85 टक्के हिस्सा अफगाणिस्तानमधून आयात केला जातो. ही गोष्ट लक्षात घेऊन तालिबानी शासकांनी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आयात-निर्यात सुरु ठेवली पाहिजे, असे मत FIEO चे संचालक अजय सहाय यांनी व्यक्त केले.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.