Afghanistan Crisis : अंगावरच्या कपड्यासह बाहेर पडलोय, चप्पल बदलायलाही वेळ नव्हता, पैशांचं तर सोडाच : अशरफ गनी

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 19, 2021 | 8:24 AM

तालिबानने अफगाणिस्तानच्या राजधानी काबुलवर कब्जा केल्यानंतर लगेचच देश सोडून पळून जाणाऱ्या राष्ट्रपती अशरफ गनी (Ashraf Ghani) यांनी बुधवारी (18 ऑगस्ट) संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. देश सोडल्यानंतरचा नागरिकांशी हा त्यांचा पहिला संवाद आहे.

Afghanistan Crisis : अंगावरच्या कपड्यासह बाहेर पडलोय, चप्पल बदलायलाही वेळ नव्हता, पैशांचं तर सोडाच : अशरफ गनी
अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीनं देश सोडताना काय काय सोबत नेलं?

काबुल : तालिबानने अफगाणिस्तानच्या राजधानी काबुलवर कब्जा केल्यानंतर लगेचच देश सोडून पळून जाणाऱ्या राष्ट्रपती अशरफ गनी (Ashraf Ghani) यांनी बुधवारी (18 ऑगस्ट) संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. देश सोडल्यानंतरचा नागरिकांशी हा त्यांचा पहिला संवाद आहे. यात त्यांनी पैसे घेऊन देश सोडल्याच्या आरोपांचं खंडन करत ते खोटं असल्याचं म्हटलं. पैशांनी भरलेल्या 4 कार आणि हेलिकॉप्टरसोबत देश सोडल्याची माहिती खरी नाही. हे सर्व विनाधार आहे. काबुलमध्ये रक्तपात होऊ नये म्हणून मी देश सोडलाय. पैशांचं सोडा, मी अंगावरील कपड्यांसह देश सोडलाय, चप्पल बदलायलाही वेळ नव्हता, असं मत अशरफ गनी यांनी व्यक्त केलं.

अशरफ गनी म्हणाले, “पैसे घेऊन देश सोडल्याची माहिती खोटी आणि बिनबुडाची आहे. केवळ रक्तपात होऊ नये म्हणून देश सोडला. अंगावरील कपड्यांसह देश सोडला, चप्पल बदलायला देखील वेळ नव्हता. त्या दिवशी राष्ट्रपती भवनातून पायात होत्या त्याच सँडलसह काबुल सोडलं. या माहितीवर विश्वास ठेऊ नये. राष्ट्रपतींनी तुम्हाला विकलंय आणि आपल्या फायद्यासाठी जीव वाचवत पळाल्याच्या आरोपांवर विश्वास ठेऊ नये. हे सर्व आरोप विनाआधार आहेत. मी जेव्हा अफगाणिस्तान सोडलं तेव्हा माझ्याकडे चप्पल बदलण्यासाठी सुद्धा वेळ नव्हता. देश सोडताना चप्पल काढून शूज घालण्यासाठी देखील वेळ नव्हता.”

यूएईकडून अशरफ गनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला मानवतेच्या आधारे देशात राहण्याची परवानगी

यूएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने अशरफ गनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला मानवतेच्या आधारे देशात राहण्याची परवानगी दिल्याच्या माहितीला दुजोरा दिलाय. याआधी अशरफ गनी नेमके कोठे आहेत याविषयी कोणतीही खात्रीशीर माहिती नव्हती. अनेकांनी ते ओमान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान किंवा लेबनानमध्ये पळून गेल्याचा अंदाज वर्तवलाय.

हेही वाचा :

Afghanistan Crisis : जीव वाचवण्यासाठी धडपड, विमानाच्या पंख्यावर बसून प्रवास, उड्डाणानंतर आकाशातून खाली कोसळला

अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीनं देश सोडताना काय काय सोबत नेलं? पैसा, गाड्यांबाबत पहिल्यांदाच रिपोर्ट

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी ओमानमध्ये, लॅंडिंगला परवानगी नाकारल्याने आखाती देशात पोहचले

व्हिडीओ पाहा :

Afghanistan President Ashraf Ghani comment on allegation after Taliban in power

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI