AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Afghanistan Crisis : जीव वाचवण्यासाठी धडपड, विमानाच्या पंख्यावर बसून प्रवास, उड्डाणानंतर आकाशातून खाली कोसळला

अफगाणिस्तान सोडण्यासाठी काबूल विमानतळावरुन उड्डाण घेणाऱ्या विमानाच्या चाकाला लटकलेल्या दोघांचा उंचावरुन पडून मृत्यू झाल्याचं कळतंय. तर, काही नागरिक विमानाच्या पंख्यावर बसून जीवघेणा प्रवास करताना दिसत असल्याचं दिसतंय.

Afghanistan Crisis : जीव वाचवण्यासाठी धडपड, विमानाच्या पंख्यावर बसून प्रवास, उड्डाणानंतर आकाशातून खाली कोसळला
विमानातून दोघे कोसळले
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Aug 16, 2021 | 2:58 PM
Share

काबूल: अमेरिकेनं त्यांचं सैन्यअफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर अवघ्या 6 दिवसांमध्ये अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवला आहे. तालिबानानं रविवारी जलालाबाद आणि काबूल शहरावर ताबा मिळवला. तालिबानाच्या सत्तेत राहण्याची मानसिकता नसलेले नागरिक मिळेल त्या मार्गानं देश सोडताना दिसत आहेत. काबूल विमानतळावर अफगाण नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याचं समोर आलं होतं. अफगाणिस्तानच्या नागरिकांची धडपड व्हिडीओमधून स्पष्ट दिसतेय. अफगाणिस्तान सोडण्यासाठी काबूल विमानतळावरुन उड्डाण घेणाऱ्या विमानाच्या चाकाला लटकलेल्या दोघांचा उंचावरुन पडून मृत्यू झाल्याचं कळतंय. तर, काही नागरिक विमानाच्या पंख्यावर बसून जीवघेणा प्रवास करताना दिसत असल्याचं दिसतंय.

अफगाणिस्तानातील विमानतळावरील दृश्य

युवकाचा विमानाच्या पंख्यावर बसून देश सोडण्याचा प्रयत्न

अफगाणिस्तानातील बिघडलेल्या परिस्थितीची दाहकता समोर येत आहे. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केलेल्या विमानाच्या पंख्यावर एक युवक बसला होता. विमान आकाशात झेपावल्यावर त्याचा ऊंचावरुन खाली कोसळल्याचं कळतंय. ही दाहक दृश्य तालिबानविषयीची अफगाण नागरिकांमधील भीती दाखवते.

अमेरिकन लष्कराकडून हवेत गोळीबार, 5 जणांचा मृत्यू

तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालंय. जो तो देश सोडण्यासाठी प्रयत्न करतोय. विमानतळावरील अफगाण नागिराकांची प्रचंड गर्दी झाल्यानं अमेरिकन लष्करानं हवेत गोळीबार केल्याचं समोर आलंय. अमेरिकेच्या लष्करानं केलेल्या गोळीबारामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान अमेरिकेनं काबूल विमानतळाचा ताबा घेतला आहे.

विमानतळावर नागरिकांची झुंबड

अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर काही काळातचं तालिबानने सक्रीय होतं, अफगाणिस्तानातील बहुसंख्य शहरांचा ताबा घेतला. राजधानी काबूलसह आता अनेक शहरं तालिबानच्या ताब्यात आहेत. यानंतर सध्याचे राष्ट्रपती अशरफ गनी हे मात्र स्वत:च्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांना सोबत घेऊन देश सोडून पळून गेलेत. ते तझाकिस्तानला पोहोचलेत. अशरफ गनी यांनी विश्वासघात केल्याची भावना अफगाण लोक व्यक्त करतायत. तर, अनेक नागरिक तालिबानच्या जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडण्याचा विचार करत आहेत. काबूलमधून बाहेर जाणाऱ्या विमानांमध्ये बसण्यासाठी नागरिकांची झुंबंड उडाली आहे.

इतर बातम्या:

Video: काबूलच्या विमानतळावर आठवडी बाजारासारखी गर्दी, विमान पकडण्यासाठी ‘एसटी’सारखी चढाओढ, अमेरिकेचा ताबा

Afghanistan Crisis : नवा राष्ट्रपती थेट देशाचं नाव बदलण्याची चिन्हं, अफगाणिस्तानात आतापर्यंत काय काय घडलं?

Afghanistan Crisis citizen two people who tied themselves to an airplane wheel falling from high as the aircraft takes off

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...