AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात, बड्या नेत्यासोबत 2 तास खलबतं, मोठं काही तरी घडणार?

एकनाथ शिंदे यांचा खास माणूस रात्री पुण्यात पोहोचला. त्यानंतर त्यांनी डॉ. अभय पाटील यांच्यासोबत दोन तास चर्चा केली. त्यामुळे चर्चांना एकच उधाण आलं आहे.

एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात, बड्या नेत्यासोबत 2 तास खलबतं, मोठं काही तरी घडणार?
eknath shindeImage Credit source: tv9
| Updated on: Aug 16, 2026 | 8:14 AM
Share

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने काँग्रेसचे 19 नगरसेवक फोडले. अमरावतीनंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. अमरावतीनंतर आता अकोल्यात काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या अभय पाटलांसोबत एकनाथ शिंदे यांचा खास माणूस ॲड. निलेश देशमुख यांनी भेट घेतली. डॉ. अभय पाटील यांच्या टॉवर चौकातील निवासस्थानीच ही भेट पार पडल्याची माहिती मिळतेय. काँग्रेसच्या कार्यपद्धतीमुळे नाराज होऊन काँग्रेस सोडणारे डॉ. अभय पाटील मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी डॉ. अभय पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर डॉ. अभय पाटील हे समर्थकांसह बैठक घेऊन मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. परंतु या बैठकीआधी त्यांनी देशमुखांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास बैठक झाली. त्यांनी एकत्र जेवण देखील केलं. त्यामुळे या डिनर डिप्लोमॅसीची जोरदार चर्चा रंगली आहे.

दोन्ही नेत्याची बैठक झाल्याने शिंदे गटाला मोठा राजकीय मासा गळाला लागल्याचे बोलले जात आहे. डॉ. अभय पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये झालेल्या बैठकीत राजकीय विषयावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे डॉ. अभय पाटील हे लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत डॉ. अभय पाटील यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांना 4 लाख 16 हजार मते मिळाली होती. अकोल्यातील निवडणुकीत वंचितचे प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या क्रमांकावर होते. काही दिवसांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीला कंटाळून डॉ. अभय पाटील यांनी पक्षाची साथ सोडली. त्यानंतर त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. त्यानंतर आता डॉ. अभय पाटील हे पुढील दोन दिवसांत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Follow Us
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल.
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल उभारला